adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

५ ऑक्टोबर पासून राज्यातील समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांचा अनादर का ? “मास्वे” चा सवाल

५ ऑक्टोबर पासून राज्यातील समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांचा अनादर का ? ...

५ ऑक्टोबर पासून राज्यातील समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांचा अनादर का ? “मास्वे” चा सवाल



चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


राज्यातील उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील समाजकार्य महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांच्या पूर्ततेकरिता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) तर्फे सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर पासून सह संचालक उच्च शिक्षण, नागपूर यांचे कार्यालय आणि मा. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानासमोर “आत्मक्लेश आंदोलन” सुरु करण्यात येणार आहे. 

मा. श्री देवेंद्र जी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री असताना दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री चंद्रकांत दादा पाटील तसेच वित्त, उच्च व तंत्र शिक्षण आणि सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी यांचे उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे ”मास्वे” संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सोबत राज्यातील समाजकार्य महाविद्यालयांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली होती. मा. उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत समाज कार्य महाविद्यालयांचे प्रश्न एक महिन्यात निकाली काढण्याचे उच्च शिक्षण विभागास निर्देश दिलेले होते. हि बैठक संपन्न होऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत परंतु अद्यापही समाज कार्य महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबितच आहेत.

 मध्यंतरीच्या काळात “मास्वे” संघटनेने उच्च शिक्षण विभागाला अनेकवेळा पत्र व स्मरणपत्र तसेच आवश्यक माहिती व कागदपत्र दिलेत तसेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव, बी. वेणुगोपाल रेड्डी , राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांच्यासोबत बैठका घेतल्या परंतु प्रत्येकवेळी आश्वासनाशिवाय काहीही झाले नाही. त्यामुळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध कायम ठेवून रिक्त पदे भरणे, सर्व कर्मचाऱ्यांचे एचटीई सेवा प्रणालीद्वारे ऑनलाईन वेतन, डीसीपीएस/एनपीएस च्या खात्यात शासन हिश्याची रक्कम जमा करणे, कॅस च्या १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयात सुधारणा, जीपीएफ करिता लेखाशीर्ष, प्राचार्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्ष करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन-उपदान प्रस्ताव मंजूर करणे, अतिप्रदान रक्कमेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे, थकीत इमारत भाडे व वेतनेतर अनुदान आदी न्याय मागण्या प्रलंबितच आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागातील समाज कार्याशी निगडीत पदांकरिता समाज कार्य पदवी हि शैक्षणिक अर्हता कायम ठेवणे, राज्यात इतर महाविद्यालयांमध्ये नवीन समाज कार्य विभाग सुरु करण्याच्या शासन निर्णयास स्थगिती देणे या सुद्धा प्रमुख मागण्या आहेत.  

उच्च शिक्षण विभागातर्फे मा. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांचा अनादर आणि समाज कार्य महाविद्यालयांच्या प्रश्नांच्या पूर्ततेबाबत करण्यात येत असलेली टाळाटाळ यामुळे ”मास्वे” संघटनेने दिनांक १९ सप्टेंबर २०२६ च्या पत्रान्वये उच्च शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव व संचालक यांना दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ पासून नागपूर येथे “आत्मक्लेश आंदोलन” करण्याचा इशारा दिलेला आहे. या आंदोलनात राज्यातील समाज कार्य महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असून आजी-माजी विद्यार्थ्यांचा तसेच विविध संघटनांचा या आंदोलनाला पाठींबा राहणार असल्याचे ”मास्वे” संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा अंबादास ये मोहिते व महासचिव डॉ संजय फुलकर यांनी कळविले आहे.

No comments