adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारतीय पत्रकार संघाच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी संजय वैरागर

भारतीय पत्रकार संघाच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी संजय वैरागर  नेवासा प्रतिनिधी कमलेश शेवाळे  (संपादक : हेमकांत गायकवाड) भारतीय पत्रकार संघाचे...

भारतीय पत्रकार संघाच्या नेवासा तालुकाध्यक्ष पदी संजय वैरागर 




नेवासा प्रतिनिधी कमलेश शेवाळे 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शेख, महाराष्ट्र लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष कैलास पठारे, प्रदेश संघटक अनिल सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ, प्रदेश सचिव रमेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कमलेश शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनेक विषयांवर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. नेवासा तालुकाध्यक्ष पदी संजय वैरागर यांची निवड करण्यात आली. सर्वांना संघटनेचे अधिकृत नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कमलेश शेवाळे यांनी सांगितले की लवकरच संपुर्ण उत्तर महाराष्ट्राचा दौरा करून उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्य़ात प्रत्येक तालुक्यात पदाधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. लवकरच एक बैठक घेऊन तालुका कार्यकारिणी जाहीर निवडण्यात येईल असे नुतन तालुकाध्यक्ष संजय वैरागर यांनी मत व्यक्त केले. यावेळी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष शरदभाऊ परदेशी, राहुरी तालुकाध्यक्ष शंकर कवाणे, जेष्ठ पत्रकार समीरभाई शेख, योगेश सुराणा, रमेश जगताप, अरूण चांदेकर, सुनिता अभंग, अलमभाई शेख, आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. संजय वैरागर यांची निवड झाल्याबद्दल शनीसेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे राज्य संपर्कप्रमुख डॉ सुधाकर निकाळजे सचिव शिवाजी दहातोंडे उपाध्यक्ष बंडुकाका दहातोंडे, बाळासाहेब जावळे, बाळासाहेब वर्मा, अशोक हराळे, निरज मनोचा, वृषभशेठ गांधी, तसेच हनुमान मंदिर ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब रक्ताटे, जेष्ठ पत्रकार अरूण सोनकर, राजेंद्र लाटे, देविदास चौरे आदींनी अभिनंदन केले आहे.

No comments