जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र. २/४...
जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जिल्हा परिषद उर्दू मुलांची शाळा क्र. २/४, चोपडा येथे शाळा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहिमेस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जमील खान करीम खान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व पालक वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सर्वांच्या सामूहिक सहभागातून शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये तसेच पालकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण व्हावी आणि शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमातून “स्वच्छ शाळा – सुंदर शाळा” आणि “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश देण्यात आला.
“स्वच्छ परिसर, निरोगी जीवन!” या संदेशाने स्वच्छता मोहिमेची सांगता करण्यात आली.



No comments