adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शिक्षण परिषद २०२६-२७ चे दुसरे पुष्प बोरखेडा खुर्द येथे उत्साहात संपन्न शिक्षकांच्या ज्ञानविनिमयातून शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना; कठोरा केंद्रातील शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती

शिक्षण परिषद २०२६-२७ चे दुसरे पुष्प बोरखेडा खुर्द येथे उत्साहात संपन्न शिक्षकांच्या ज्ञानविनिमयातून शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना; कठोरा केंद...

शिक्षण परिषद २०२६-२७ चे दुसरे पुष्प बोरखेडा खुर्द येथे उत्साहात संपन्न

शिक्षकांच्या ज्ञानविनिमयातून शैक्षणिक गुणवत्तावाढीस चालना; कठोरा केंद्रातील शिक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती




तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर

(संपादक : हेमकांत गायकवाड)


बोरखेडा खुर्द, ता. यावल : माध्यमिक विद्यालय बोरखेडा खुर्द येथे बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षण परिषद सन २०२६-२७ चे दुसरे पुष्प अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाले.

ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष श्री. भैय्यासाहेब पवार सर यांच्या परवानगीने तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. आर. नपते सर आणि कठोरा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महंमद तडवी सर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून ग. स. संस्थेचे संचालक श्री. योगेश इंगळे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि. प. मराठी शाळा, बोरखेडा येथील ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. राजेंद्र सोनवणे सर यांनी भूषविले.

या शिक्षण परिषदेस कठोरा केंद्रांतर्गत विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिषदेत शैक्षणिक गुणवत्तावाढ, अध्यापनातील नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच शिक्षकांच्या अनुभवांची देवाणघेवाण यांसह विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन व विचारविनिमय करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आनंद मेघे सर यांनी आपल्या प्रभावी शैलीत केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विद्यालय बोरखेडा खुर्द येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सौ. विद्या भारंबे मॅडम, श्री. जावेद तडवी सर, श्रीमती प्रिया शिंदे मॅडम, सौ. कांचन आदिवाले मॅडम आणि सौ. नीलिमा टोके मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांना एकत्र आणून ज्ञान, अनुभव व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण घडवून आणणारी ही शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments