adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुका, यावल शहर व फैजपूर शहर काँग्रेसची संवाद बैठक उत्साहात संपन्न!

यावल तालुका, यावल शहर व फैजपूर शहर काँग्रेसची संवाद बैठक उत्साहात संपन्न! यावल तालुका प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) रावेर येथे यावल ...

यावल तालुका, यावल शहर व फैजपूर शहर काँग्रेसची संवाद बैठक उत्साहात संपन्न!




यावल तालुका प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर येथे यावल तालुका काँग्रेस कमिटी, यावल शहर काँग्रेस कमिटी व फैजपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल चे माजी आमदार रमेशदादा चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून रावेर-यावल मतदारसंघाचे माजी आमदार शीरीषदादा चौधरी उपस्थित होते.

यावल तालुकाध्यक्ष प्रशांत भगवान पाटील यांनी बैठकीची प्रस्तावना केली. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर शेठ चौधरी, काँग्रेस पुर्वचे जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी, विलास शेट तायडे, यावल शहराध्यक्ष हकीम शेट, फैजपूर शहराध्यक्ष रीयाजभाई, शब्बीर शेठ गणेश गुरव सर, उमेश जावळे, धीरज कुरकुरे, टेनू सोनार, अमोल भीरूड, उमर कच्छी, नितीन सपकाळे, अरुण कोळी, गफूर तडवी, शेख अश्रम, शेख खलाल, शेख नाईम, शेख शरीफ, दीपक कोळी, भागवत पाचपुडे, सुगदेव बोदडे, अनिल महाजन, वासुदेव पाटील, भरत पाटील, भोजराज पाटील, सतीश तायडे, सय्यद असद जावेद, सय्यद असद अहमद, कदीर उस्मान, सय्यद जिया उलखल, शेख गफ्फार, याकूब, किरण भाऊरे, विजय पाटील, राजू सेवालाल, कल्पना जाई तायडे (महिला तालुकाध्यक्ष), अजय रामदास तायडे, सचिन पाटील, राजेंद्र भारंबे, यावल युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल कोळी, सुनील पाटील, किशोर पाटील, संजय वराडे, गुलाम गोश, शेख निसार, शेख हमीद, करीम मन्न्यार, नगरसेवक प्रकाश सराफ, योगेश वसंत भाऊसार, डॉ. गणेश भगवान चौधरी, तुषार राणे, कुणाल चौधरी, मैबूब पिंजरी, श्यामराव मेळे, ज्ञानेश्वर भराटे, मुंगा धर्मा सोनावणे, डुलकू मेळे, लतीफ तडवी, सब्दल तडवी, राजू तडवी, रमजान तडवी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र चौधरी, युवराज चौधरी, नीरज चौधरी, जगदीश महाजन, चंद्रकांत चौधरी, निजामुद्दीन, डॉ. दानिश बीन सर, इरफान मेंबर फैजपूर, मुक्तार शेख फैजपूर, शेख रियाज फैजपूर, तसलीम मेंबर फैजपूर, आसिफ फैजपूर, गिरीश देशमुख, मुक्कम इचखे, दिलबार तडवी, शरत पाटील सरपंच शुभम विसावे, प्रसन्न महाजन, विकास अभिमन्यू, महेंद्र उद्धव धांडे, अजय वसंत तायडे, ज्ञानेश्वर तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीदरम्यान आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, बूथ स्तरापासून काँग्रेसची संघटना अधिक सक्रिय करणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे तसेच गावागावात नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

या संवाद बैठकीदरम्यान विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. नव्याने काँग्रेस परिवारात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

आगामी काळात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा तसेच संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

No comments