adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना; पंढरीच्या वारकऱ्यांचा आकर्षक देखावा

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना; पंढरीच्या वारकऱ्यांचा आकर्षक देखावा जळगाव प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) पर्याव...

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना; पंढरीच्या वारकऱ्यांचा आकर्षक देखावा





जळगाव प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगाव येथील पवार परिवाराच्या घरी यंदा पर्यावरणपूरक शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी गणरायासाठी साकारण्यात आलेला ‘पंढरीचे वारकरी’ हा आकर्षक व मनमोहक देखावा विशेष लक्षवेधी ठरला.


गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्याला सामाजिक व पर्यावरणपूरक विचारांची जोड मिळावी, या उद्देशाने पवार परिवाराने शाडू मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक भक्ती, वारकरी संप्रदायाची संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचा सुंदर मिलाफ या देखाव्यातून करण्यात आला आहे.


श्री गजाननाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष व शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार, शिवतेज नवनिर्माण फाऊंडेशनच्या सचिव वैशाली पवार तसेच त्यांचा मुलगा राघवेंद्र पवार उपस्थित होते. परिवाराने गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.


‘पंढरीचे वारकरी’ या देखाव्यातून महाराष्ट्राच्या संतपरंपरेची आणि वारकरी संस्कृतीची सुंदर अनुभूती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विठ्ठल नामाचा गजर, भक्तीभाव आणि वारकऱ्यांची वारी यामुळे घरातील गणेशोत्सवाला एक वेगळेच आध्यात्मिक व सांस्कृतिक रूप प्राप्त झाले आहे.


“गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचीही काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करून आणि नैसर्गिक साधनसंपत्तीला हानी न पोहोचवता उत्सव साजरा करण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचला पाहिजे,” अशी भावना कल्पेश पवार यांनी व्यक्त केली.


पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबरोबरच आपल्या समृद्ध संस्कृती, परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचेही पवार परिवाराने सांगितले.


“गणपती बाप्पा मोरया!

मंगलमूर्ती मोरया!

पंढरीनाथ महाराज की जय!”

No comments