adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मरहुम शाह निजाम नन्हेमियां सय्यद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी विद्यार्थ्यांनी डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक - तन्वीर चष्मावाला

मरहुम शाह निजाम नन्हेमियां सय्यद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी विद्यार्थ्यांनी डोळ्यांची काळजी घेणे  अत्यंत आवश्यक ...

मरहुम शाह निजाम नन्हेमियां सय्यद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी

विद्यार्थ्यांनी डोळ्यांची काळजी घेणे 

अत्यंत आवश्यक - तन्वीर चष्मावाला




शौकतभाई शेख / श्रीरामपूर

(संपादक : हेमकांत गायकवाड)


लहानपणा पासूनच डोळ्यांची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.आजच्या काळात मोबाईल, टीव्ही, संगणक आणि इतर डिजिटल उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची नेहमी काळजी घेतली पाहिजे.

सर्वप्रथम मोबाईल किंवा संगणकाचा वापर करताना तो डोळ्यांच्या अगदी जवळ धरू नका. बराच वेळ स्क्रीनकडे सतत पाहू नका. अभ्यास किंवा स्क्रीनचा वापर करताना मध्ये मध्ये डोळ्यांना विश्रांती द्या आणि काही वेळ दूरच्या वस्तूकडे पाहा.

वाचन करताना पुरेसा प्रकाश असणे गरजेचे आहे. अंधारात किंवा कमी प्रकाशात पुस्तक वाचणे टाळा. पुस्तक डोळ्यांच्या अगदी जवळ धरून वाचू नका आणि झोपून वाचण्याची सवयही टाळा.

डोळ्यांना वारंवार हात लावणे किंवा घाणेरड्या हातांनी डोळे चोळणे टाळा. हात स्वच्छ ठेवणे ही डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची सवय आहे. डोळ्यांत धूळ किंवा एखादा कण गेल्यास डोळे जोरात चोळू नका.

आहाराकडेही लक्ष द्या.जर वाचताना अक्षरे स्पष्ट दिसत नसतील, फळ्यावरचे लिहिलेले दिसत नसेल, वारंवार डोके दुखत असेल, डोळ्यांत जळजळ किंवा पाणी येत असेल अथवा टीव्ही किंवा मोबाईल अगदी जवळ घेऊन पाहण्याची सवय लागली असेल, तर ही लक्षणे दुर्लक्षित करू नका. तातडीने पालकांना सांगा आणि नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घ्या. चष्मा लागणे ही लाजण्याची गोष्ट नाही. योग्य नंबरचा चष्मा वेळेवर वापरल्याने अभ्यास करताना आणि दैनंदिन जीवनात स्पष्ट दिसण्यास मदत होते. डॉक्टरांनी चष्मा वापरण्याचा सल्ला दिल्यास तो नियमित वापरा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अलनुर आय केअर सेंटरचे संचालक तनवीर चष्मावाला यांनी सांगितले.

माजी परिवहन अधिकारी मरहुम शाह निजाम नन्हेमियां सय्यद यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने नगर शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फकीरवाडा येथील विद्यार्थ्यांची मोफत कॉम्प्युटराईज्ड डोळे व नंबर तपासणी करण्यात आली.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य जपणे तसेच त्यांच्या दृष्टीशी संबंधित समस्या वेळीच निदर्शनास आणून त्यावर योग्य उपचार व उपाययोजना करणे हा होता. अलनुर आय केअर सेंटरचे तन्वीर चष्मावाला यांनी विद्यार्थ्यांची कॉम्प्युटराईज्ड पद्धतीने नेत्र तपासणी करून त्यांना डोळ्यांची योग्य निगा राखण्याबाबत मार्गदर्शन केले.

तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांना चष्म्याचा नंबर आढळून आला, अशा विद्यार्थ्यांना अत्यंत अल्प दरात चष्म्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.

यावेळी मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, अलनुर आय केअर सेंटरचे तन्वीर चष्मावाला, शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम अब्दुल गफूर शेख, दिलशाद मुसा शेख, सुमय्या मोसिन पठाण आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उपस्थितांनी सांगितले.


वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान 


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments