कानळदा येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम विश्राम तेले चौगाव प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) जळगाव : भारतीय रिझर्व्ह बँक, सें...
कानळदा येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम
विश्राम तेले चौगाव प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
जळगाव : भारतीय रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांच्या सहकार्याने अॅक्सेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, दिल्ली संचालित मनीवाइज सेंटर फॉर फिनान्शियल लिटरसी, जामनेर ब्लॉक जळगाव अंतर्गत कानळदा येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्य क्रमात विविध मान्य वरांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया,
जळगाव विभागाचे एल. डी. ओ. मा.श्री आकर्षण अविनाश सर यांनी बँकिंग लोकपाल, ग्राहकांचे हक्क व बँकिंग सुविधा या विषयावर सविस्तर माहिती दिली. विविध योजना विशेषतः शेतकरी व महिला बचत गटांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. सायबर गुन्हे व ऑन लाइन फसवणूक टाळण्या साठी आवश्यक काळजी याविषयी मार्गदर्शन करताना आकाश मेहेत्रे क्षेत्रीय व्यव स्थापक, अकोला विभाग यांनी आजच्या डिजिटल युगातील सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित केले. तर श्री अभिलाश वाघ सर बँक मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया कानळदा (SBI)यांनी डिजिटल पेमेंट, विमा, पेन्शन व बचत गुंतवणूक याविषयी नागरिकांना सखोल माहिती दिली. तसेच या माहिती नुसार सर्वांच्या PMSBY,PMJBY विमा APY पेन्शन बालसंगोपन योजना ई योजना कार्य क्रमाचे सूत्रसंचालन करतांना श्री सुनिल भील केंद्र व्यवस्थापक अमळनेर यांनी माहिती दिली तसेच सुशिक्षित बेरोजगारांना युवकांना RSETI माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना बाबत माहिती दिली तसेच आजच्या कार्यक्रमास यांनी मा.श्री जगदीश सपकाळे ग्राम पं. सदस्य यांनी ग्रा.प.कानळदा वतीने सर्व मान्यवरांच्या शब्द सुमनाने स्वागत केले तसेच मा.श्री भिकन सपकाळे ग्राम पंचायत सदस्य कानळदा यांची उपस्थित होती तसेच मा. श्री सुनिल भाऊ गायकवाड सामजिक कार्यकर्ते यांनी ग्रामस्थांच्या विविध समस्या मांडल्या तसेच श्री रवि भाऊ मोरे सामजिक कार्यकर्ते कानळदा यांनी कार्यक्रमासाठी मदत केली तसेच तसेच आजचा कार्यक्रमाचा नियोजन श्री साहेबराव सुरवाडे केंद्र व्यवस्थापक CFL जामनेर व श्री दर्पण मोरे FC जळगाव उपस्थित होते व विविध बचत गटातील CRP सदस्य तसेच गावातील मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आर्थिक शिस्त, डिजिटल व्यवहाराची सवय आणि बचत व गुंतवणुकी बाबतची जाणीव वाढीस लागते. समाजाच्या सर्वागीण आर्थिक प्रगतीसाठी अशा प्रशिक्षण शिबिरांचे मोलाचे योगदान असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ यांचा CFL सेंटर टीम च्या वतीने आभार व्यक्त करण्यात आला

No comments