पारोळा येथे शेतकरी संघटने कडून स्व. शरद जोशी यांना अभिवादन विकास पाटील जळगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पारोळा : येथे नॅशनल हायवे क्र....
पारोळा येथे शेतकरी संघटने कडून स्व. शरद जोशी यांना अभिवादन
विकास पाटील जळगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पारोळा : येथे नॅशनल हायवे क्र.६. ओम शिव ठिबक या फर्मवर शेतकऱ्यांचे पंचप्राण. युगात्मा व शरद जोशी यांची ९१वी. जयंती उत्साहात साजरा करण्यात आली
जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी आपल्या मनोगत स्वर्गीय शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला. शरद जोशी . परदेशात I A S. अधिकारी असताना भारतातील शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय त्यांच्या लक्षात येतात. मोठ्या पगाराची नोकरी सोडून भारतात आले व शेतकऱ्यांसाठी आपले आयुष्य वेचले. शेती आणि शेतकरी यांच्यासाठी रान उठवले शेतकऱ्यांना रास्त भाव तंत्रज्ञान स्वातंत्र्य मुक्त बाजारपेठ या विषयांवर अहोरात्र काम केले शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी सतत झगडणारे. व रस्त्यावर उतरून न्याय मिळवून देणारे. आपल्या अभ्यासपूर्ण एक एक विषय हाताळून पूर्णत्वास नेणारे खरे शेतकरी नेते होत असे स्व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे किशोर पाटील यांनी प्रतिपादन केले
यावेळी पारोळा तालुका अध्यक्ष प्रा. भिकन राव पाटील यांनी. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक पानाला उजाळा देत शरद जोशी म्हणजे आपल्या भारत वर्षाला लाभलेले कोहिनूर हिरा. भारतातील शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांनी आपले. सुखी संसारावर तुळशी पत्र ठेवत स्वतःच्या संसाराला तिलांजली देत शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचे कार्य. व शेतकऱ्यांसाठी एक आशा देत शेतकऱ्यांसाठी एक चंग बांधत संघटनेची मुहूर्त मेढ रोवली. चांदवड येथे दोन लाख महिलांचा भव्य मेळावा घेऊन आपल्या देशातील माता भगिनी यांची दुःख जोडून पाहिले व त्यावर उपाययोजना करण्याचा त्यांनी मनात. आश्रयाचे स्थान देत शेतकरी महिला मजूर यासाठी भव्य योगदान दिले
अशा कर्तुत्वास शेतकरी संघटना जळगाव शेतकरी संघटना पारोळा च्या वतीने कोटी कोटी अभिवादन करण्यात आले
यावेळी स्व.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील. पारोळा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. भिकनराव पाटील. छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील एडवोकेट. कुणाल बागड रवींद्र पाटील गुलाब पाटील जगदीश पाटील प्रमोद तिवारी रवींद्र पाटील व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

No comments