adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते ६.५१ कोटींच्या कामाचा शुभारंभ

 फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन  केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई  खडसे यांच्या हस्ते ६.५१ कोटींच्या कामाचा...

 फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

 केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई  खडसे यांच्या हस्ते ६.५१ कोटींच्या कामाचा शुभारंभ 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथे दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या हस्ते ६.५१ कोटींच्या कामाचा शुभारंभ

फैजपूर यावल-रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत  येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन  श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिनी उत्साहात संपन्न झाले. केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या हस्ते या विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण विकासकामासाठी शासनाकडून ६ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. फैजपूर  येथे उभारण्यात येणारी ही नवीन प्रशासकीय इमारत फैजपूर, सावदा परिसरासह रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सध्याच्या प्रशासकीय कामकाजाच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नवीन इमारतीमुळे नागरिकांना अधिक प्रशस्त, सुसज्ज आणि सुविधायुक्त वातावरणात शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावीपणे पार पाडण्यासही या इमारतीमुळे चालना मिळणार आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय हे रावेर व यावल तालुक्यातील प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असल्याने या नवीन इमारतीच्या उभारणीमुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आधुनिक प्रशासकीय सुविधांसह उभारण्यात येणाऱ्या या इमारतीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

भूमिपूजन सोहळ्यास  फैजपूरचे नगराध्यक्ष, दामिनी सराफ माजी नगराध्यक्ष निलेश राणे. हिरालाल चौधरी. भरत महाजन. उपनगराध्यक्ष पप्पू चौधरी. नगरसेवक पवन सराफ.राहुल गुजराती. नगरसेविका सुनीता नेहेते. नगरसेवक महेंद्र मंडवाले  राजेश महाजन सागर होले नगरसेविका जयश्री चौधरी नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण विकासकामाला सुरुवात झाले फैजपूर-सावदा परिसरासह रावेर व यावल तालुक्यातील नागरिकांना अधिक चांगल्या प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे विकासकाम महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

No comments