adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )

  अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हा...

 अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )

मराठी वारसा या यूट्यूब चैनल वरील "सावित्रीबाई जोतिराव फुले मालिका " सहकुटुंब पहावी - शिवदास महाजन ( विधीकर्ते )




विकास पाटील धरणगाव प्रतिनिधी 

(संपादक :- हेमकांत गायकवाड)

धरणगाव तालुक्यातील अनोरे गावाचे ज्ञानेश्वर दत्तू महाजन यांचे वडील निसर्गवासी दत्तू हरी महाजन यांचा गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने पार पडला. सर्वप्रथम संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना गाऊन प्रबोधन केले.

          याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होऊन सत्यशोधक विचारांनी मार्गक्रमण करावे. शिक्षण हे मानव मुक्तीचे साधन आहे.गुलामगिरी हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी सत्यशोधक विधी, विवाह, दशक्रिया विधी, गृहप्रवेश  करावेत. मराठी वारसा यूट्यूब चैनल वरील सावित्रीबाई जोतिराव फुले ही मालिका सर्वांनी आवर्जून पहावी व खरा इतिहास समजून घ्यावा असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

          माळी समाजाध्यक्ष हरी महाजन व सरपंच स्वप्निल महाजन यांनी मनोगत व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. सत्यशोधक विधीची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांच्याकडून मिळाली. याप्रसंगी सर्व पित्रांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आली. रोकडे परिवाराच्या माध्यमातून शेतात, परिसरात लिंब ,पिंपळ , वड या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

            याप्रसंगी मधुकर नामदेव देशमुख ( उपाध्यक्ष बी जे विद्यालय ), हरी तुकाराम महाजन (माळी समाजाध्यक्ष ), स्वप्निल लक्ष्मण महाजन ( सरपंच ), भाऊसाहेब संभाजी पाटील ( पोलीस पाटील ), ज्ञानदेव राजाराम पाटील ( विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन) रवींद्र लोटन चव्हाण, त्र्यंबक रोकडे, रघुनाथ रोकडे, नामदेव रोकडे, सुरेश रोकडे,संतोष रोकडे,राजेंद्र रोकडे यासह गावातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय, आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments