भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा कार्यकारीणीत श्रीरामपूरातील अनेक कार्यकर्त्यांना संधी मोहसीन सय्यद व इस्माईल शेख उपाध्यक्ष, तांबोळी कोषाध्यक्ष त...
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा कार्यकारीणीत श्रीरामपूरातील अनेक कार्यकर्त्यांना संधी मोहसीन सय्यद व इस्माईल शेख उपाध्यक्ष, तांबोळी कोषाध्यक्ष तर साजिद शेख सरचिटणीस
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा उत्तर नगर जिल्हा कार्यकारीणी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी नुकतीच घोषित केली.या कार्यकारिणीमध्ये श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मा.खा.सुजय विखे पाटील, अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेश प्रभारी राजेश पांडे, राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासीत अली,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिपक आण्णा पटारे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम बागवान, महामंत्री एजाज भाई शेख, फत्तुभाई सय्यद,भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही घोषणा करण्यात आली.
नुतन जिल्हा कार्यकारिणीत श्रीरामपूर तालुक्यातून मोहसीन बाहोद्दिन सय्यद व हाजी ईस्माईल शेख यांना उपाध्यक्ष, अन्वरभाई तांबोळी यांना कोषाध्यक्ष,अजिजभाई शेख यांना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष तर आसिफ पोपटीया यांना श्रीरामपूर शहराध्यक्ष तसेच साजिद नजीर शेख यांना जिल्हा सरचिटणीस, ॲड. सलमान शकील पठाण यांना जिल्हा सचिव, मजीदभाई पठाण (खोकर) व शफिक बागवान (बेलापूर) यांना जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती देण्यात आली आहे.
तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मंडलांसाठी मंडल अध्यक्षांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
अल्पसंख्याक समाजातील विविध घटकांपर्यंत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविणे, युवकांना संघटनेशी जोडणे, सामाजिक प्रश्नांवर काम करणे तसेच पक्षाचे संघटन अधिक व्यापक व मजबूत करण्यावर नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या विचारानुसार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आगामी काळातील संघटनात्मक व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे संघटन अधिक सक्रिय व सक्षमपणे विचार समाजापर्यंत पोहोचवेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर तालुक्यातील नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
--------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार
सलिमखान पठाण - श्रीरामपूर
--------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments