adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खामगावचे सुरजभैय्या यादव यांना राष्ट्रीय 'चक्रवर्ती सम्राट अशोक रक्तयोद्धा सन्मान'

खामगावचे सुरजभैय्या यादव यांना राष्ट्रीय 'चक्रवर्ती सम्राट अशोक रक्तयोद्धा सन्मान' खामगाव तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड...


खामगावचे सुरजभैय्या यादव यांना राष्ट्रीय 'चक्रवर्ती सम्राट अशोक रक्तयोद्धा सन्मान'





खामगाव तालुका प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


खामगाव: एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष _सुरजभैय्या यादव_ यांना मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील _आई बगलामुखीच्या पवित्र धरतीवर वसलेल्या नलखेडा_ येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित _'चक्रवर्ती सम्राट अशोक रक्तयोद्धा सन्मान 2026'_ ने सन्मानित करण्यात आले. आई बगलामुखी धाम, नलखेडा येथील सरस्वती शिशु विद्या मंदिरात रक्तदान महादान मित्र मंडळाच्या वतीने हा भव्य राष्ट्रीय रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, गुजरात, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा (हैदराबाद), आसाम, सिक्कीम आणि हरियाणा अशा देशभरातील 15 राज्यांतील रक्तदूत सहभागी झाले होते.

या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सुरजभैय्या यादव यांना थॅलेसेमिया, सिकलसेल आणि रक्तदान जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आई बगलामुखी मंदिरापासून रक्तदान जनजागृती रॅलीने झाली. _या रॅलीमध्ये तिरंगा झेंडा आणि देशभक्ती गीत आकर्षणाचे केंद्र ठरले._ त्यानंतर बैजनाथ ब्लड बँक आगर यांच्या सहकार्याने 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या सन्मान सोहळ्याप्रसंगी एकनिष्ठा फाऊंडेशनचे सहकारी _गोपाल सायखेडे_ आणि _उमेश पांडे_ हे सोबत उपस्थित होते.

हा सन्मान माझा एकट्याचा नसून खामगावच्या आणि देशातील प्रत्येक रक्तदात्याचा आहे, अशी भावना सुरजभैय्या यादव यांनी व्यक्त केली. अशी माहिती सोमेश वराडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

No comments