adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

केळी पीकविमा ट्रिगर प्राप्त लाभार्थी महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करा

केळी पीकविमा ट्रिगर प्राप्त लाभार्थी महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देताना यावल शहराच्या लोकनियुक्त नगराध...

केळी पीकविमा ट्रिगर प्राप्त लाभार्थी महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करा




संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देताना यावल शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई पाटील चितोडा येथील माजी सरपंच बेबीताई पाटील यावल चे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल दादा पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी संतोष खर्चे कडू नाना पाटील व इतर मान्यवर


यावल तालुका प्रतिनिधी : भरत कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा

​यावल : पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२५-२६ अंतर्गत केळी पिकासाठी पात्र ठरलेल्या महसूल मंडळांची यादी तातडीने जाहीर करून शेतकऱ्यांना विमा परतावा मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

​या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जळगाव जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला आहे. सदर योजनेचा अधिकृत विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै २०२६ रोजी संपुष्टात आला असून, नियमानुसार विमा कालावधी संपल्यापासून ४५ दिवसांच्या आत हवामानाच्या ट्रिगरनुसार पात्र ठरणाऱ्या महसूल मंडळांची यादी घोषित होणे अपेक्षित होते. मात्र, कालावधी उलटूनही प्रशासनाकडून अधिकृत यादी जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संभ्रम व असंतोष निर्माण झाला आहे.

​केळी उत्पादक शेतकरी आधीच विविध नैसर्गिक संकटांमुळे व आर्थिक अडचणींनी ग्रासलेले आहेत. अशा स्थितीत विमा परतावा वेळेत न मिळाल्यास त्यांच्यासमोरील आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यास्तव, यावल तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील हवामान निर्देशांकानुसार पात्र ठरलेल्या सर्व महसूल मंडळांची यादी पुढील ४ ते ५ दिवसांत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने तातडीने जाहीर करण्यात यावी. तसेच नवीन व जुन्या महसूल मंडळांमधील हवामान केंद्रांवर नोंदवले गेलेले तापमान, वाऱ्याचा वेग आणि पर्जन्यमान याबाबतची सर्व माहिती पारदर्शकपणे उपलब्ध करून देण्यात यावी. याशिवाय, अवेळी पाऊस व हवामानातील बदलांमुळे अडचणीत आलेल्या केळी उत्पादकांना विमा भरपाई देण्यास टाळाटाळ किंवा विलंब करणाऱ्या विमा कंपनीवर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनात समाविष्ट करण्यात आली आहे.

​प्रशासन व संबंधित विमा कंपनीने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न केल्यास यावल तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

​या निवेदनावर लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील, शिवसेना तालुका प्रमुख बापूसाहेब शरद कोळी, माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक अतुल दादा पाटील, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष धोबी नगरसेवक सागर कुमार सुनील चौधरी,नगरसेवक पराग सराफ, नगरसेवक वैशाली ताई बारी माजी शिवसेना तालुकाप्रमुख, कडू नाना पाटील, योगेश पाटील, योगेश चौधरी, सारंग बेहेडे,सुनिल जोशी आर. के. चौधरी,किशोर माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या

No comments