गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ३०८ उपद्रवी ५ दिवस हद्दपार - पो.नि.संदीप पाटील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीसांची सतर्कता! रावेर प...
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी ३०८ उपद्रवी ५ दिवस हद्दपार - पो.नि.संदीप पाटील
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलीसांची सतर्कता!
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रावेर पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगून कठोर पावलं उचलली असून कायद्याचा बडगा उगारत रावेर च्या ३०८ उपद्रवी वर श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक काळातील पाच दिवसांसाठी हद्दपार केलेल्या कारवाईनंतर रावेर पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे
आगामी गणेश विसर्जन मिरवणुक कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच मिरवणूक निर्भय निर्विघ्न व शांततेत, सुरक्षित पार पडण्यासाठी रावेर पोलीस प्रशासनाने रावेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध प्रकारच्या गुन्ह्यातील संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ३०८ उपद्रवीवर पाच दिवस रावेर तालुक्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आला.
असून संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा रावेर पोलीस प्रशासनाने उगारला आहे.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक निर्विघ्न शांततेने व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायद्याच्या कक्षेतील विविध कलमांन्वये रावेर पोलीस स्टेशनचे हद्दीतील ३०८ जणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवला गेला आहे. या प्रस्तावानुसार दि. २२ पासून हद्दपारीचा आदेश लागू होणार असून, दि. २७पर्यंत म्हणजे सलग पाच दिवस या सर्व उपद्रवी व्यक्तींना रावेर तालुक्याच्या सीमेत प्रवेश करण्यास सक्त मनाई असणार आहे.पोलिस प्रशासनाला याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी केले आहे.

No comments