adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी कोळी जमातीने मानले आ. अमोलभाऊ जावळे यांचे आभार मुंजोबा देवस्थानासाठी २ कोटी ३१ लाखांचा निधी; आदिवासी वसतिगृहालाही मंजुरी

आदिवासी कोळी जमातीने मानले आ. अमोलभाऊ जावळे यांचे आभार मुंजोबा देवस्थानासाठी २ कोटी ३१ लाखांचा निधी; आदिवासी वसतिगृहालाही मंजुरी यावल तालुका...

आदिवासी कोळी जमातीने मानले आ. अमोलभाऊ जावळे यांचे आभार

मुंजोबा देवस्थानासाठी २ कोटी ३१ लाखांचा निधी; आदिवासी वसतिगृहालाही मंजुरी




यावल तालुका प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


 यावल तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कार्यसम्राट आमदार अमोल दादा जावळे यांच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

यावल तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत श्री मुंजोबा देवस्थान, अट्रावल (ब वर्ग तीर्थक्षेत्र) येथे विविध विकासकामे करण्यासाठी तब्बल २ कोटी ३१ लाख ८९ हजार रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीमुळे देवस्थान परिसरातील विविध विकासकामांना चालना मिळणार असून, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

तसेच यावल शहरात आदिवासी शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहाला मंजुरी मिळाल्याने आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना निवासाची सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मदत होणार आहे.

या दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल यावल तालुक्यातील आदिवासी व कोळी जमातीच्या बांधवांच्या वतीने आमदार अमोल दादा जावळे यांचा सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

जनतेच्या मागण्या आणि समस्या शासन दरबारी मांडून त्यांचा सातत्याने पाठपुरावा करणे, विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे आणि तालुक्याच्या विकासाला गती देण्याच्या प्रयत्नांबद्दल आमदार अमोल जावळे यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.

No comments