अंतुर्ली येथे विधाता गणेश मंडळा कडून भंडाऱ्याचे आयोजन प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) अंतुर्ली ता. मुक्ताईनगर दरवर्षी प्रमा...
अंतुर्ली येथे विधाता गणेश मंडळा कडून भंडाऱ्याचे आयोजन
प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज नगर अंतुर्ली येथे विधाता गणेश मंडळाकडून गणेश उत्साहानिमित्त भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते.प्र सादा मध्ये वरण,पोळी, कढी हा मेनू असतो. तसेच गणेश मंडळाकडून दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आरोग्य शिबीर,सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, व विविध उपक्रम राबीविण्यात येतात.तसेच गावातील सर्व गणेश मंडळ प्रसाद सेवन करतात, महिला, मित्र मंडळी, नागरिक सर्व समाज बांधव प्रसादाचा लाभ घेतात.

No comments