adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार- पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन पाणी प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर

  निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार- पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील चिंचोली गुरव उपसा सिंचन पाण...

 निळवंडेच्या पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार- पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील


चिंचोली गुरव उपसा सिंचन पाणी प्रकल्पासाठी पाच कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर





शिर्डी / उमाका वृत्तसेवा


(संपादक : हेमकांत गायकवाड)


 चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांच्या आयुष्यातील आज एक आनंदाचा क्षण आहे . निळवंडे धरण lलाभक्षेत्राला पाण्याचा लाभ देण्याच्या पार्श्वभूमीवर चिंचोली गुरव पंचक्रोशीतील उपसा सिंचन योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.


 संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.  

यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे ,यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


1985 पासून प्रलंबित असलेली मागणी अखेर मार्गी


 पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, सन 1985 पासून सुमारे 795 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळावे, ही येथील ग्रामस्थांची जुनी मागणी होती. कालवे वाहते झाल्यानंतर केवळ 350 हेक्टर क्षेत्रालाच पाण्याचा लाभ मिळत होता. मात्र, उर्वरित गावांना पाणी मिळावे म्हणून स्वतंत्र प्रस्तावाच्या माध्यमातून ही उपसा सिंचन योजना आता कार्यान्वित केली जात आहे. यामुळे उर्वरित 300 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी मिळणार असून, या योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.


प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेले निळवंडे कालव्यांचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे धरणाच्या मुखापासून कालव्यांच्या कामांना प्रत्यक्ष प्रारंभ झाला. जिरायती भागातील कालव्यांचे काम टप्प्याटप्प्याने विनाअडथळा पूर्ण करून आश्वासने न देता ते काम पूर्ण करून दाखविले. असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले. 

भोजापूर पूरचारीचा समावेश

 'दमणगंगा-वैतरणा-गोदावरी' नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून शासनाने या भागातील गावांना खरा न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.

अस्मानी संकटात शेकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध


राज्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने उद्भवलेल्या परिस्थितीवर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, 'अल निनो'च्या संकटामुळे पावसाचे सर्व अंदाज फोल ठरले असून आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अस्मानी संकटात राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. सरकारने पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले असून, एनडीआरएफच्या निकषानुसार सर्व मदत दिली जाईलच. शनिवारपर्यंत शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी आणि चाऱ्याच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पंचायत समिती स्तरावर टँकरचे वेळापत्रक गांभीर्यपूर्वक तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आणि 48 हजार कोटी रुपयांची वीजबिल माफी करून आपली शेतकरी बांधवाप्रती बांधिलकी आहे हे स्पष्ट केले.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments