शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त चोपडा तालुका काँग्रेसतर्फे अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा : शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या ...
शहीद भगतसिंग जयंतीनिमित्त चोपडा तालुका काँग्रेसतर्फे अभिवादन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा : शहीद-ए-आझम भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील तसेच मा. ताईसाहेब डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शहीद भगतसिंग यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या त्यागाचे व बलिदानाचे स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन देशहित, सामाजिक एकोपा आणि लोकशाही मूल्यांसाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश पाटील, आजबराव पाटील, प्रमोद पाटील, जहीर पठाण, दिलीप साळुंखे, प्रदीप पाटील, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, रमाकांत सोनवणे, शैलेशकुमार वाघ, चंद्रकांत पाटील, फिरोज खान, नगरसेवक वंदना बाविस्कर, नगरसेवक वंदना पाटील, फातिमाबी पठाण, जहागीर गफार, राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, छगन पाटील, भरत पाटील, देविदास सोनवणे, माणिक पाटील, बाळकृष्ण पाटील, सतीश पाटील, संदीप देसले, शांताराम लोहार, देविदास साळुंखे, सुमित पाटील, सुधाकर बाविस्कर, अल्पसंख्यांक अध्यक्ष इलियास पटेल,उखा बारेला,अकिल शेख, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.

No comments