adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वर्डी ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांविरोधात बेमुदत आमरण उपोषण १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, ग्रामनिधी व पाणीपुरवठा कामांच्या चौकशीची मागणी

  वर्डी ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांविरोधात बेमुदत आमरण उपोषण १५ वा वित्त आयोग,दलित वस्ती सुधार योजना, ग्रामनिधी व पाणीपुरवठा कामांच्या ...

 वर्डी ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकारांविरोधात बेमुदत आमरण उपोषण

१५ वा वित्त आयोग,दलित वस्ती सुधार योजना, ग्रामनिधी व पाणीपुरवठा कामांच्या चौकशीची मागणी





चोपडा तालुका प्रतिनिधी रविंद्र कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा : वर्डी ग्रामपंचायतीच्या कारभारातील कथित गैरप्रकार व अनियमिततेच्या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, या मागणीसाठी वर्डी येथील अविनाश चुडामण शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, चोपडा येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांनी वर्डी ग्रामपंचायतीमध्ये १५ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना, ग्रामनिधी तसेच पाणीपुरवठा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. या सर्व कामांची प्रशासकीय पातळीवर सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीचा नियमानुसार वापर करण्यात आला आहे का, संबंधित विकासकामे मंजूर अंदाजपत्रक व प्रशासकीय मान्यतेनुसार झाली आहेत का, कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि दर्जा योग्य आहे का, याची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

तसेच संबंधित कामांची प्रशासकीय कागदपत्रे, खर्चाचे विवरण, मंजुरी, कामांचे मोजमाप व प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून आवश्यक ती चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, उपोषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी आणि नियमबाह्य बाबी आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सदर बेमुदत आमरण उपोषण छत्रपती शिवाजी महाराज चौक, चोपडा येथे सुरू करण्यात आल्याचे फलकावर नमूद आहे.


No comments