adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासकीय प्राथमिक आश्रम शाळा अर्थे खुर्द ता.शिरपुर जि. धुळे येथील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

शासकीय प्राथमिक आश्रम शाळा अर्थे खुर्द ता.शिरपुर जि.धुळे येथील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग शिरपूर प्रतिनिधी (संपादक :...

शासकीय प्राथमिक आश्रम शाळा अर्थे खुर्द ता.शिरपुर जि.धुळे येथील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग





शिरपूर प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)


शिरपूर तालुक्यातील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेत दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कागदावर विविध विषयांवरील चित्रे रंगवली. स्वच्छ भारत, सुंदर शाळा, वृक्षसंवर्धन, पर्यावरण रक्षण व पाणी बचत यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून चित्रे साकारली.

रंगीत पेन्सिल, क्रेयॉन व विविध रंगांचा वापर करून विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे तयार केली. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासोबतच पर्यावरण व सामाजिक विषयांबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमधून ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘पाणी वाचवा आणि पर्यावरण जपा’ असा संदेश देण्यात आला. शाळेतील या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments