adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला मिळणार बळ; मनवेल येथे सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन

आदिवासी खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला मिळणार बळ; मनवेल येथे सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन चोपडा (प्रतिनिधी) (संपादक : हेमकांत गायकवाड) एकात्...

आदिवासी खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला मिळणार बळ; मनवेल येथे सांघिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन




चोपडा (प्रतिनिधी)

(संपादक : हेमकांत गायकवाड)


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल अंतर्गत चोपडा बीटस्तरीय क्रीडा स्पर्धा दि. २२ व २३ सप्टेंबर २०२६ रोजी अनुदानित आश्रमशाळा मनवेल येथे पार पडणार आहेत.या स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळून त्यांच्या सुप्त क्रीडा कौशल्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या क्रीडा स्पर्धांमध्ये चोपडा बीटअंतर्गत विविध आश्रमशाळांमधील ९०० आदिवासी विद्यार्थी-खेळाडू सहभागी होणार असून मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये ते आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करतील. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली जिद्द, मेहनत,शारीरिक क्षमता आणि स्पर्धात्मक वृत्ती या स्पर्धांच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी 

आदिवासी खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करावी,त्यांच्यातील गुणवत्ता पुढे यावी आणि प्रकल्पस्तरीय तसेच पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी गुणवंत खेळाडूंची निवड व्हावी,हा या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे अशी भावना व्यक्त केली आहे.

स्पर्धेसाठी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अनुदानित आश्रमशाळा मनवेल यांच्या वतीने नियोजन करण्यात आले असून, आदिवासी विद्यार्थी-खेळाडूंमध्ये स्पर्धेचा उत्साह निर्माण झाला आहे. मैदानावर आदिवासी खेळाडूंच्या जिद्दीची आणि क्रीडा कौशल्याची चुरस पाहायला मिळणार आहे.

No comments