adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

करवंद नाका परिसराची शान सांस्कृतिक गणेश मित्र मंडळाचा २३ सप्टेंबरला भव्य महाप्रसाद

 करवंद नाका परिसराची शान सांस्कृतिक गणेश मित्र मंडळाचा २३ सप्टेंबरला भव्य महाप्रसाद शिरपूर प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शिरपूर : ...

 करवंद नाका परिसराची शान

सांस्कृतिक गणेश मित्र मंडळाचा २३ सप्टेंबरला भव्य महाप्रसाद


शिरपूर प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिरपूर : करवंद नाका परिसरातील गणेशोत्सवाची भक्तिमय आणि सामाजिक परंपरा जपणाऱ्या करवंद नाका परिसर सांस्कृतिक गणेश मित्र मंडळाच्या वतीने बुधवार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत करवंद नाका परिसर, शिरपूर येथे हा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष व मार्गदर्शक मा. श्री. गणेशभाऊ सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि स्वखर्चाने साजरा केला जात आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजाला प्रेरणादायी संदेश देणारे भव्य सामाजिक देखावे सादर करण्याची मंडळाची विशेष परंपरा आहे.

यापूर्वी मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या नृसिंह अवतार, हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हाद यांच्या कथानकावर आधारित देखाव्याने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. भक्त प्रल्हादाची परमेश्वरावरील श्रद्धा, हिरण्यकश्यपूचा अहंकार आणि नृसिंह अवताराचे प्रकटणे हा प्रसंग प्रभावीपणे साकारण्यात आला होता. उत्कृष्ट प्रकाशयोजना, संवाद आणि आकर्षक सादरीकरणामुळे या देखाव्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

धर्म, भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधत मंडळाने गणेशोत्सवाची परंपरा अधिक व्यापक आणि समाजोपयोगी करण्याचा प्रयत्न केला आहे. याच भक्तिमय परंपरेचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ करवंद नाका परिसरासह शिरपूर शहरातील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईच्या बँजो पथकाचे विशेष आकर्षण

या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे मुंबईतील प्रसिद्ध बँजो पथकाचा स्टेज कार्यक्रम होणार आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या बँजो पथकाचे शिरपूर शहरात विशेष सादरीकरण होणार असल्याने भाविकांसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

महाप्रसाद व भक्तिमय कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करवंद नाका परिसर सांस्कृतिक गणेश मित्र मंडळ, शिरपूर (FIGHT GROUP) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

No comments