विरवाडे येथील संजीवनी दूध उत्पादक सोसायटीचा तालुक्यात प्रथम क्रमांक उत्कृष्ट कामकाजाबद्दल वार्षिक सभेत सन्मान प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपा...
विरवाडे येथील संजीवनी दूध उत्पादक सोसायटीचा तालुक्यात प्रथम क्रमांक
उत्कृष्ट कामकाजाबद्दल वार्षिक सभेत सन्मान
प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
विरवाडे, ता. चोपडा : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव या संस्थेची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात पार पडली. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील संजीवनी सहकारी दूध उत्पादक सोसायटी लि., विरवाडे या संस्थेची तालुक्यातील प्रथम क्रमांकाची प्राथमिक दूध उत्पादक संस्था म्हणून बक्षीसासाठी निवड करण्यात आली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचा जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन श्री. मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
संस्थेचे चेअरमन मनोजदादा तसेच सचिव निलेशदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दूध उत्पादक सभासदांच्या सहकार्याने संस्थेने उत्कृष्ट कामकाज केले. दूध उत्पादकांना वेळेवर व चांगल्या सेवा देत संस्थेने केलेल्या कामाची दखल घेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने विरवाडे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या यशाबद्दल दूध उत्पादक सभासद, संचालक मंडळ व ग्रामस्थांकडून संस्थेचे चेअरमन, सचिव तसेच सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


No comments