चोपडा नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सफाई कर...
चोपडा नगरपरिषदेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
चोपडा प्रतिनिधी अशोक कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सफाई कर्मचारी तसेच नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या व वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी तसेच डॉक्टरांकडून आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. ‘आपले आरोग्य — आपली जबाबदारी’ या संदेशातून नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा नम्रता पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे उपअधिकारी, संजय मिसर कर्मचारी, डॉक्टर व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.


No comments