बँक कर्मचाऱ्यांची देशव्यापी संपाची घोषणा... बँका तीन दिवस बंद राहणार अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) बँक कर्मचारी...
बँक कर्मचाऱ्यांची देशव्यापी संपाची घोषणा... बँका तीन दिवस बंद राहणार
अंतुर्ली प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
बँक कर्मचारी हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. ग्राहकांना सातत्याने सेवा बँक कर्मचारीदेतअसतात हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत. ग्राहकांना सातत्याने सेवा देताना बँक कर्मचारी मोठ्या जबाबदारीने आणि मेहनतीने काम करतात. वाढता कामाचा ताण, ग्राहक सेवा, डिजिटल व्यवहार, रोख व्यवहार तसेच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असताना कर्मचाऱ्यांनाही पुरेसा विश्रांतीचा वेळ मिळणे आवश्यक आहे.
२८, २९ आणि ३० सप्टेंबर २०२६ रोजी बँक कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संपाची घोषणा केली असून, पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करणे ही प्रमुख मागणी आहे. सध्या बँकांना महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते; सर्व शनिवार सुट्टीचे करून सोमवार ते शुक्रवार कामकाज करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे.
इतर अनेक शासकीय विभागांमध्ये कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोन दिवसांची सुट्टी मिळते. त्याच धर्तीवर बँक कर्मचाऱ्यांनाही नियमित साप्ताहिक विश्रांती मिळाल्यास काम आणि वैयक्तिक जीवनातील समतोल, कार्यक्षमता तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.
हा संप केवळ सुट्टीसाठी नसून, बँक कर्मचाऱ्यांच्या कामाच्या परिस्थिती आणि पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याच्या मागणीसाठीचे आंदोलन आहे. बँक कर्मचारी वर्षभर ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतात; त्यामुळे त्यांच्या विश्रांतीच्या आणि कल्याणाच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
“मेहनतीला सन्मान, कर्मचाऱ्यांना विश्रांती आणि ग्राहकांना अधिक कार्यक्षम सेवा — पाच दिवसांचा बँकिंग आठवडा ही काळाची गरज.” बँक कर्मचारी मोठ्या जबाबदारीने आणि मेहनतीने काम करतात. वाढता कामाचा ताण, ग्राहक सेवा, डिजिटल व्यवहार, रोख व्यवहार तसेच विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळत असताना कर्मचाऱ्यांनाही पुरेसा विश्रांतीचा वेळ मिळणे आवश्यक आहे.

No comments