adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोमांस विक्री व कत्तली करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांची कारवाई

गोमांस विक्री व कत्तली करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांची कारवाई    यावल तालुका प्रतिनिधी भरत कोळी  (संपादक : हेमकांत गायकवाड) पोलिसांनी तालुक्य...

गोमांस विक्री व कत्तली करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांची कारवाई 





 यावल तालुका प्रतिनिधी भरत कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


पोलिसांनी तालुक्यातील किनगाव बु,गावात गौसिया नगर भागात गोमांस विक्री व कत्तली करता आणलेले दोन बैल या संदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीवरून किनगाव गावात पहाटे पाच वाजेच्या सुमारास छापा टाकून सहा आरोपींना पकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीचे साडेतीनशे किलो वजनाचे गोमांस व दोन जिवंत गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आढळून आल्यामुळे पोलिसांनी छापा टाकून जप्त केले आहे तर दोन आरोपी फरार झाले आहेत.

यामुळे तालुक्यात गोमांस विरोधात पुन्हा यावल पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेमुळे गोवंश कत्तल करणाऱ्या आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी फोन करून गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे यांनी सापळा रचला. त्यानुसार दिनांक २८ नोव्हेंबर २६ (२८ सप्टेंबर २६) च्या सकाळी पाच वाजेच्या दरम्यान किनगाव येथील गौसिया नगर भागात रशीद बशीर कुरेशी यांचे घराचे मागे एका बंदिस्त जागेत त्याने जिवंत गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणून बांधून ठेवलेले आहेत व तो त्याचे राहते घरी गोमांस विक्री सुद्धा करीत आहे तसेच समीर सलीम कुरेशी हा सुद्धा त्याचे राहते घराची मागे गोमांस विक्री करीत आहे तसेच कुरेशी व इम्तियाज खलील कुरेशी हे त्याचे मोटार सायकलने गोमांस विक्री करता घेऊन जात असतात अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे, सहाय्यक फौजदार अर्जुन सोनवणे, पोलीस हवालदार रोहील गणेश, पोलीस शिपाई सचिन पाटील, नितेश बागुल, अनिल साळुंखे यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी जाऊन सदरची कारवाई केली.

No comments