adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणावर काँग्रेस आक्रमक; चोपड्यात जोरदार आंदोलन

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणावर काँग्रेस आक्रमक; चोपड्यात जोरदार आंदोलन चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा, दि. ३० सप्टेंबर...

मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणावर काँग्रेस आक्रमक; चोपड्यात जोरदार आंदोलन




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा, दि. ३० सप्टेंबर २०२६ : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, पात्र मतदारांचे नाव कोणत्याही कारणाने मतदार यादीतून वगळले जाऊ नये आणि प्रत्येक नागरिकाला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. भैयासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा नागरिकांच्या लोकशाही सहभागाचा मूलभूत आधार आहे. त्यामुळे मतदार यादी तयार करणे, पुनरीक्षण करणे, पात्र मतदारांची नावे समाविष्ट करणे तसेच अपात्र किंवा चुकीच्या नोंदी वगळण्याची प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे काँग्रेसच्या निवेदनात नमूद करण्यात आले.

भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर SIR-2026 संदर्भात मतदार यादी, नाव शोधण्याची सुविधा, अर्जांची स्थिती, BLOशी संपर्क तसेच दावे व हरकतींसाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत.

 पात्र मतदाराचे नाव वगळू नये.

मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी संबंधित नागरिकाला पूर्वसूचना देऊन आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी द्यावी.

SIR प्रक्रियेतील ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) नोंदींची योग्य व प्रत्यक्ष पडताळणी करावी.

मतदार यादीतून नाव वगळण्याचे कारण संबंधित नागरिकाला स्पष्टपणे उपलब्ध करून द्यावे.

प्राप्त दावे व हरकतींची निष्पक्ष सुनावणी करून त्यावर वेळेत निर्णय घ्यावा.

प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळण्यासाठी BLO व निवडणूक अधिकाऱ्यांची प्रभावी व्यवस्था करावी.

नागरिकांना आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी तसेच दुरुस्ती अथवा दावा करण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून द्यावी.

संपूर्ण SIR प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि सर्व राजकीय पक्षांच्या सहभागातून राबवावी.

पात्र मतदारांची नावे मोठ्या प्रमाणावर वगळली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची तातडीने चौकशी करून आवश्यक दुरुस्ती करावी.

प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार अबाधित राहील, याची निवडणूक प्रशासनाने दक्षता घ्यावी, 

निवडणूक आयोगाच्या अनेक गोष्टी या संशयित आहेत त्याला पारदर्शकता ठेवलेली नाही त्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा द्यावा.

“मतदार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू असून, कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून अन्यायकारक पद्धतीने वगळले जाऊ नये. SIR प्रक्रिया नागरिकांचा विश्वास कायम ठेवणारी आणि पूर्णपणे पारदर्शक असली पाहिजे,” अशी भूमिका आंदोलनात मांडण्यात आली. 

यावेळी तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष अशोक साळुंखे, के डी चौधरी सर, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर सांगोरे, जिल्हा सचिव आरिफ शेख,जाहीर पठाण, नवाब तडवी, बाळकृष्ण पाटील, नगरसेवक रमाकांत ठाकूर, नगरसेवक अमोल पाटील, सुमित पाटील, देवानंद शिंदे,प्रकाश पाटील, शांताराम लोहार, दीपक चौधरी, जे आर पाटील,किसान काँग्रेस अध्यक्ष शशिकांत साळुंखे, अल्पसंख्यांक अध्यक्ष इलियास पटेल, जहागीर पठाण, फातिमा बी पठाण, चिरयोद्दीन शेख, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments