adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"न्यू गोल्डन सर्कस" श्रीरामपूरात दाखल ! सर्कस पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी

  "न्यू गोल्डन सर्कस" श्रीरामपूरात दाखल ! सर्कस पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी दिपक कदम / श्रीरामपूर (संपादक : हेमकांत गायकवा...

 "न्यू गोल्डन सर्कस" श्रीरामपूरात दाखल !

सर्कस पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी




दिपक कदम / श्रीरामपूर

(संपादक : हेमकांत गायकवाड)

बऱ्याच दिवसांनंतर नव्हे, तर तब्बल वर्षभरानंतर संगमनेर रोडवरील बुवा मंगल कार्यालयासमोर न्यू गोल्डन सर्कस श्रीरामपूर शहरात दाखल झाली आहे. सर्कशीतील विविध खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

कारण "न्यू गोल्डन सर्कस" ही सर्कस आवघ्या काही दिवसांपूर्तीच श्रीरामपूर शहरात राहणार असून तोपर्यंतच या सर्कस चा लाभ घेणे उचित ठरणार आहे.

आजची नवी पिढी मोबाईलच्या माध्यमातून सर्कशीचे चलतचित्र पाहते. मात्र, या सर्कशीतून विविध कलाकारांचे थरारक व कौशल्यपूर्ण खेळ प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहण्याची संधी मिळत आहे. त्यासोबतच सर्कशीतील हास्यसम्राट जोकरचे विविध हास्यकारनामे आणि मनोरंजनाचा अनमोल खजिना प्रेक्षकांना अनुभवता येत असल्याने न्यू गोल्डन सर्कशीला श्रीरामपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘प्रेक्षक हेच माझे दैवत’

न्यू गोल्डन सर्कसचे मालक श्री. प्रकाश महादू माने हे असून, त्यांचा सर्कस व्यवसाय पिढ्यानपिढ्या सुरू आहे. त्यांचे आजोबा रामआप्पा महादेव माने यांच्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय सलग तीन पिढ्यांपासून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. प्रकाश माने यांनी सांगितले की, त्यांनी आतापर्यंत तब्बल आठ सर्कस उभ्या केल्या होत्या. सध्या त्यांच्याकडे चार सर्कस आहेत. अत्यंत कष्टाने त्यांनी हा व्यवसाय उभा केला असून, व्यवसायाच्या वाटचालीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मागील काळात गुजरातमध्ये त्यांची सर्कस वाहून गेली होती. मात्र, या संकटाने खचून न जाता त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने सर्कस व्यवसाय सुरू ठेवला.

‘सर्कस उभी करणे आणि ती चालवणे यामध्ये किती कष्ट असतात, याची आम्हाला जाणीव आहे,’ असे सांगताना त्यांनी आपल्या आजोबांचे एक वाक्यही आवर्जून सांगितले. ‘कष्टाने माणूस पुढे गेला, तर तो शेवटपर्यंत जगू शकतो,’ हा विचार घेऊनच आपण आजही सर्कस व्यवसायात कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

न्यू गोल्डन सर्कसमध्ये विविध राज्यांतील कलाकार एकत्रितपणे काम करीत आहेत. पश्चिम बंगाल, मणिपूर, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान आदी राज्यांतील कलाकारांचा या सर्कशीत सहभाग आहे.

शेवटी बोलताना श्री. प्रकाश माने यांनी, ‘माझे एकच दैवत आहे आणि ते म्हणजे प्रेक्षक. प्रेक्षक हेच आमचे खरे दैवत आहे,’ अशी भावना व्यक्त केली. प्रेक्षकांचे दर्शन हेच आमच्यासाठी देवदर्शन असल्याचेही त्यांनी सांगितले.

बालगोपालांसह संपूर्ण कुटुंबाने न्यू गोल्डन सर्कशीला भेट देऊन मनोरंजनाचा आनंद घ्यावा, आपल्या मुलांना प्रत्यक्ष सर्कस दाखवावी आणि सर्कस व्यवसायाला साथ द्यावी, असे आवाहनही श्री. माने यांनी केले आहे.


वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस

श्रीरामपूर - 9561174111

No comments