भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या सेंट अलोशियस स्कूल, तुम आणि उपविजेत्या ताप्ती स्कूल...
भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न
भुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या सेंट अलोशियस स्कूल, तुम आणि उपविजेत्या ताप्ती स्कूल संघासोबत डॉ. प्रदीप साखरे, अभिषेक चावरे आणि इतर दिसत आहेत.
लियाकत शाह जळगांव
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व नगरपरिषद, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धांचे आयोजन बियाणी मिलिटरी स्कूल येथे २५ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल ३२ संघांनी सहभाग घेतल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, तालुका क्रीडा अधिकारी डॉ. नितीन जंगम, मनीष बियाणी, प्राचार्य डी. पाटील, प्रा. मनोज वारके, हिम्मत पाटील यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.
या प्रासंगी अभिषेक चावरे म्हणाले, “आजच्या काळात खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय राहिलेला नसून त्यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. ग्रामीण व तालुका स्तरावरूनच अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचतात. त्यामुळे युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहून मेहनत, सातत्य आणि शिस्तीने खेळावे.”
विविध वयोगटांत चुरशीच्या लढती स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
*१९ वर्षे मुलांच्या वयोगटात*
नाहाटा कॉलेजने प्रथम तर अलहिरा उर्दू स्कूलने द्वितीय क्रमांक मिळवला.
१७ वर्षे
सेंट अलॉयसेस स्कूल भुसावळ प्रथम, ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ द्वितीय क्रमांक
१४ वर्षे
सेंट अलॉयसेस स्कूल प्रथम, ताप्ती पब्लिक स्कूल, द्वितीय
*१७ वर्षे मुलींच्या गटात*
ताप्ती पब्लिक स्कूल प्रथम, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलने द्वितीय.
क्रमांक पटकावला.
१४ वर्षे
ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ प्रथम, तर बियाणी मिलिटरी स्कूल द्वितीय ठरले.
पंचांनी बजावली महत्त्वाची भूमिका
स्पर्धेतील पंच म्हणून डॉ. प्रदीप साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरहान शेख, सिद्धेश नरवाडे, मुजमिल शेख, माविया कुरैशी, चेतन बडगे, ॲलिस्टर सिमन्स, सुमित दासगुप्ता, अर्जुन सणस, तोसिफ कुरैशी, याकूब शेख आदींनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भुसावळ तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक तसेच बियाणी स्कूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


No comments