adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपडा तालुक्यात १७ सप्टेंबर २०२६ रोजी 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालती'चे आयोजन; ८ मंडळ मुख्यालयांसह तहसील कार्यालयात होणार सुनावणी

चोपडा तालुक्यात १७ सप्टेंबर २०२६ रोजी 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालती'चे आयोजन; ८ मंडळ मुख्यालयांसह तहसील कार्यालयात होणार सु...

चोपडा तालुक्यात १७ सप्टेंबर २०२६ रोजी 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालती'चे आयोजन; ८ मंडळ मुख्यालयांसह तहसील कार्यालयात होणार सुनावणी




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत “महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान” राबविण्यात येत आहे

. या अभियानांतर्गत चोपडा तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच सर्व महसूल मंडळ अधिकारी यांच्या स्तरावर प्रलंबित असलेली अर्धन्यायिक (Quasi-Judicial) महसुली प्रकरणे आपापसातील सहमतीने व तडजोडीने निकाली काढण्यासाठी गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता प्रथम महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे,


आयोजनाची ठिकाणे व कार्यक्षेत्र: १. तहसीलदार व नायब तहसीलदार स्तर: तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या न्यायालयातील प्रलंबित दाव्यांची सुनावणी तहसील कार्यालय, चोपडा येथे आयोजित केली जाईल.

२. महसूल मंडळ अधिकारी स्तर (८ मंडळ मुख्यालये): तालुक्यातील ८ महसूल मंडळांमधील प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित महसूल मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालय ठिकाणी, म्हणजेच चोपडा, आडगाव, अडावद, धानोरा , गोरगावले, चहार्डी, लासुर आणि हातेड येथे लोक अदालतीचे प्रत्यक्ष आयोजन करण्यात येत आहे.

महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांमुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचून प्रकरणे सामंजस्याने कायमस्वरूपी निकाली काढणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे...


महसूल लोक अदालतीचे प्रमुख मुद्दे व कार्यपद्धती:

अर्जाची प्रक्रिया: ज्या वादी (अर्जदार) व प्रतिवादी (उत्तरवादी) यांच्या प्रलंबित अर्धन्यायिक दाव्यांमध्ये तडजोड होत असेल, त्यांनी अथवा त्यांच्या विधीतज्ज्ञांनी (वकिलांनी) विहित 'प्रपत्र-अ' मधील नमुन्यात तडजोडनामा अर्ज सादर करावयाचा आहे...


छाननी व कायदेशीर तडजोडनामा: प्राप्त अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षांच्या संमतीची खात्री केली जाईल व त्यांच्याकडून कायदेशीर तडजोडनामा (Consent Terms) प्राप्त करून घेतला जाईल


अतिम निकाल: निश्चित केलेल्या लोक न्यायालयाच्या दिवशी (१७ सप्टेंबर २०२६) दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यांवर अंतिम आदेश पारित करून प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढली जातील...


उपस्थित राहण्याचे आवाहन:

चोपडा तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच सर्व ८ महसूल मंडळांतील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांतील सर्व वादी, प्रतिवादी आणि त्यांच्या विधीतज्ज्ञांनी (वकिलांनी) या लोक अदालतीत सहभाग नोंदवावा, ज्या दाव्यांमध्ये आपापसात तडजोडीची शक्यता आहे, अशा सर्वांनी दिनांक १७.०९.२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता आपापल्या संबंधित मुख्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहून आपले दावे तडजोडीद्वारे निकाली काढावेत, असे आवाहन तहसीलदार चोपडा यांच्या वतीने करण्यात येत आहे...

No comments