खडके खुर्द येथे आजपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ विकास पाटील (संपादक : हेमकांत गायकवाड) एरंडोल : तालुक्यातील खडके खुर्द येथे ...
खडके खुर्द येथे आजपासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ
विकास पाटील
(संपादक : हेमकांत गायकवाड)
एरंडोल : तालुक्यातील खडके खुर्द येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सप्ताहाला मंगळवार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत असून गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६ रोजी सांगता होणार आहे.
या सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ वाजता काकडा आरती, सायंकाळी ४ ते ६ वाजता हरिपाठ तसेच रात्री ९ ते ११ वाजता हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. विविध भागातील कीर्तनकार, गायक व भजनी मंडळे या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
सप्ताहाच्या माध्यमातून गावात भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा वाढविण्याचा संदेश देण्यात येत आहे. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनाम संकीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
२४ सप्टेंबर रोजी सप्ताहाची सांगता व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच गावातील व परिसरातील भजनी मंडळे सप्ताहात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.

No comments