रावेर पोलिसांची मोठी कारवाई जनावरांच्या तस्करीचे ३ गुन्हे दाखल.तीन वाहनेही जप्त रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक :- हेमकांत गायकवाड) र...
रावेर पोलिसांची मोठी कारवाई जनावरांच्या तस्करीचे ३ गुन्हे दाखल.तीन वाहनेही जप्त
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
रावेर पोलिसांनी विस्कळित वाहतूक बेशिस्त वाहनधारक तसेच वाहन तपासणी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये सुभाष पेट्रोल पंप परिसरात तीन वेगवेगळ्या वाहनांमधून जनावरांची सुटका केली असून, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या पोलीस कारवाईमुळे अवैध पशुधन तस्करीला आळा बसेल.
पहिले प्रकरण - एमएच २० बीटी ३३७२
१००० क्रमांकाच्या एका लहान हत्ती वाहनातून बैलांची तस्करी होत असल्याची तक्रार प्राप्त झाली. पोलिसांनी ते वाहन जप्त केले आणि ४०,००० रुपये किमतीचे बैल व अंदाजे १ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले. शेख शोएब शेख शरीफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, त्याच ठिकाणी MH 02 CX 4101 या वाहनातून तस्करी सुरू होती. पोलिसांनी ७५,००० रुपये किमतीची चार जनावरे आणि १.७५ लाख रुपये किमतीचे एक वाहन जप्त केले. मोहसिन खान आणि अयुब खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसरे प्रकरण MH 02 ER 6929
वाहनाचीही परवानगीशिवाय तस्करी केली जात होती. पोलिसांनी दोन जनावरांची सुटका केली. कॉन्स्टेबल विशाल पाटील यांच्या तक्रारीच्या आधारे, मदिना कॉलनीतील शेख कुर्बान शेख रईस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments