मराठे तालुका चोपडा मध्ये नेटवर्कच्या समस्येमुळे मोबाईलचे ग्राहक त्रस्त AI निर्मित काल्पनिक फोटो गलंगी, ता. चोपडा : (स...
मराठे तालुका चोपडा मध्ये नेटवर्कच्या समस्येमुळे मोबाईलचे ग्राहक त्रस्त
AI निर्मित काल्पनिक फोटो
गलंगी, ता. चोपडा :
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
मराठे ग्रुप ग्रामपंचायत गणपुर हे चोपडा तालुक्यातील मोठे गाव असूनही येथे मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या ग्राहकांसह नागरिकांना भेडसावत आहे.
मराठे गाव उंच, खोल भागात असल्यामुळे अनेक ठिकाणी नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही. सध्या एअरटेल कंपनीचेटॉवर असतानाही कॉल ड्रॉप होणे, इंटरनेट स्लो चालणे तसेच अनेक वेळा पूर्ण नेटवर्क गायब होण्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. विशेष म्हणजे एअरटेल कंपनीने स्वतंत्र टॉवर असूनही
विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण,
शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना व्यवहार तसेच सामान्य नागरिकांना दैनंदिन संपर्क करताना मोठ्या अडचणी येत आहेत. संबंधित एअरटेल कंपनीने तत्काळ नेटवर्कची समस्या सोडवून, सुरळीत सेवा द्यावी. नाहीतर आमच्या गावासाठी जिओ कंपनीने नवीन मोबाईल टॉवर उभारून नागरिकांना चांगल्या नेटवर्क सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मराठे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांसह महिला मंडळ व विद्यार्थ्यांनी ग्राहकांनी केली आहे. तर प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन संबंधित कंपन्यांशी पाठपुरावा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

No comments