adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धरणगावात १७ सप्टेंबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’ प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी

धरणगावात १७ सप्टेंबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’ प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी विकास पाटील  (संपादक : ...

धरणगावात १७ सप्टेंबरला ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत’

प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी




विकास पाटील 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


धरणगाव : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यभरात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत धरणगाव तालुक्यातील प्रलंबित अर्धन्यायिक महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

    तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची सुनावणी तहसील कार्यालय, धरणगाव येथे होणार असून, मंडळ अधिकारी स्तरावरील प्रकरणांची सुनावणी संबंधित मंडळ मुख्यालयी आयोजित करण्यात येणार आहे.

       या लोक अदालतीचा मुख्य उद्देश महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे पक्षकारांचा वेळ व पैसा वाचवून, परस्पर सहमती व तडजोडीच्या माध्यमातून प्रकरणे कायमस्वरूपी निकाली काढणे हा आहे.

     ज्या प्रकरणांमध्ये वादी व प्रतिवादी यांच्यात तडजोडीची शक्यता आहे, त्यांनी अथवा त्यांच्या वकिलांनी विहित नमुन्यात तडजोडनामा अर्ज सादर करावा. अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षांची संमती निश्चित केल्यानंतर कायदेशीर तडजोडनामा घेण्यात येईल. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी दोन्ही पक्षांच्या सहमतीने अंतिम आदेश पारित करून प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत.

    धरणगाव तालुक्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांतील सर्व वादी, प्रतिवादी तसेच त्यांच्या विधीतज्ज्ञांनी या लोक अदालतीचा लाभ घ्यावा आणि १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात उपस्थित राहून तडजोडीद्वारे आपली प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन तहसील कार्यालय, धरणगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments