13 महाराष्ट्र बटालियनतर्फे खामगाव येथे एनसीसी कॅम्पला उत्साहात सुरुवात खामगाव तालुका प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) 13 महाराष्ट्र बटाल...
13 महाराष्ट्र बटालियनतर्फे खामगाव येथे एनसीसी कॅम्पला उत्साहात सुरुवात
खामगाव तालुका प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
13 महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने खामगाव येथे आयोजित 10 दिवसीय वार्षिक प्रशिक्षण शिबिराला (ATC) आज दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहात सुरुवात झाली. हे शिबिर 11 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत चालणार आहे.
या शिबिरात जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधील जवळजवळ 400 एनसीसी विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराचे कॅम्प कमांडंट कर्नल ओमेश शुक्ला हे असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडत आहे. त्यांच्यासोबत सुभेदार मेजर रवण कुमार*व बटालियनचा संपूर्ण स्टाफ शिबिराची व्यवस्था पाहत आहे.
या शिबिरात एनसीसी अधिकारी म्हणून कॅप्टन सातव सर, चिफ ऑफिसर भरगडे सर, फर्स्ट ऑफिसर कुमरे सर, सेकंड ऑफिसर काळे सर, सेकंड ऑफिसर वशिम सर हे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
शिबिराचा उद्देश
या शिबिराचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व अनुशासन, राष्ट्रप्रेम, नेतृत्व गुण व सामाजिक बांधिलकी या गुणांचा विकास करणे हा आहे. मिलिटरी ट्रेनिंग अंतर्गत विद्यार्थ्यांना ड्रिल, फायरिंग, पी.टी. परेडचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी कर्नल ओमेश शुक्ला यांनी कॅडेट्सना मार्गदर्शन करताना देशसेवा, शिस्त व कर्तव्यनिष्ठेचे महत्त्व पटवून दिले.


No comments