adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर येथील पी एम श्री जि.प उर्दू बॉईज शाळा क्रमांक १ मध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

रावेर येथील पी एम श्री जि.प उर्दू बॉईज शाळा क्रमांक १ मध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न  इदू पिंजारी फैजपुर  (संपादक : हेमकांत...

रावेर येथील पी एम श्री जि.प उर्दू बॉईज शाळा क्रमांक १ मध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न 




इदू पिंजारी फैजपुर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

रावेर : समुह साधन केंद्र, रावेर उर्दू, ता. रावेर अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ऑगस्ट २०२६ मध्ये उत्साहात संपन्न झाली. या परिषदेचे आयोजन पी. एम. श्री. जि. प. उर्दू बाईज शाळा क्र. १, रावेर येथे करण्यात आले.

केंद्र प्रमुख अहमद खान सर यांच्या अध्यक्षतेखाली

परिषदेत मागील महिन्यातील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत विचार-विनिमय करण्यात आला. तसेच निपुण भारत अभियान, पाठाचे नियोजन, विविध शैक्षणिक उपक्रम आणि पालकांचा शाळेतील सहभाग या विषयांवर विकार सर यांनी मार्गदर्शन केले व चर्चेत शिक्षकांनी भाग घेतले . 

शाळेतील शिक्षण सेवक नावेद सर पाठाचे नियोजन या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. शा. पो. आहार अधिक्षक श्री बखाल सर यांनी शिक्षकांना अनमोल असे मार्गदर्शन केले तसे

यावेळी शिक्षकांना आपले शैक्षणिक अनुभव तसेच विविध उपक्रमांची माहिती एकमेकांशी शेअर केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण व परिणामकारक उपक्रम राबविण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. या परिषदेमुळे शिक्षकांना शैक्षणिक नियोजन आणि प्रभावी अध्यापनासाठी नवी दिशा मिळाली.

कार्यक्रमास केंद्रातील शिक्षक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन विकार सर यांनी केले तर आभार अजहर सर यांनी मानले परिषद यशस्वी साठी प्रभारी मुख्याध्यापक रईस सर व शिक्षकांनी सहकार्य केले.

No comments