adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल नगरपरिषद बांधकाम समितीची पहिलीच सभा उत्साहात संपन्न तब्बल ७९ विषयांना एकमताने मंजुरी; शहरातील विकासकामांना मिळणार गती

यावल नगरपरिषद बांधकाम समितीची पहिलीच सभा उत्साहात संपन्न तब्बल ७९ विषयांना एकमताने मंजुरी; शहरातील विकासकामांना मिळणार गती यावल प्रतिनिधी  (...

यावल नगरपरिषद बांधकाम समितीची पहिलीच सभा उत्साहात संपन्न

तब्बल ७९ विषयांना एकमताने मंजुरी; शहरातील विकासकामांना मिळणार गती




यावल प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

यावल नगरपरिषदेच्या बांधकाम समितीची पहिलीच सभा आज सकारात्मक व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहराच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या या बैठकीत तब्बल ७९ विविध विकासकामांच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

या पहिल्याच सभेच्या अध्यक्षस्थानी बांधकाम समितीच्या सभापती खान अंजुम बी. कदिर होत्या. बैठकीला समितीचे सदस्य शालूबाई भालचंद्र भालेराव, वैशाली निलेश बारी, राकेश मुरलीधर कोलते आणि योगेश विजय चौधरी उपस्थित होते.

अधिकारी व प्रशासनाची उपस्थिती

बैठकीला नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता संग्राम शेळके तसेच कार्यालय अधीक्षक विशाल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंजूर करण्यात आलेल्या विविध विषयांच्या तांत्रिक व प्रशासकीय बाबी अधिकाऱ्यांनी सभेसमोर मांडल्या.

शहराच्या पायाभूत सुविधांना प्राधान्य

पहिल्याच सभेत ७९ विषयांना सर्व सदस्यांच्या संमतीने मंजुरी मिळाल्याने शहरातील प्रलंबित विकासकामांना आता गती मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा सुधारणा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच विविध ठिकाणांचे सुशोभीकरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांचा समावेश असल्याची माहिती मिळाली.

शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्व सदस्यांनी एकमताने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, विकासकामे प्रत्यक्षात जलदगतीने मार्गी लागावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments