त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन! जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) सरका...
त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन!
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
सरकारने नुकतीच दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा केली आहे. मात्र, त्र्यंबकेश्वर तालुक्याचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी त्र्यंबकेश्वर व हरसूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या
त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करावा.
शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व आवश्यक सवलती मिळाव्यात.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने व तातडीने लक्ष द्यावे.
या आंदोलनात शेतकरी बांधव, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकजुटीने आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात येत आहे


No comments