सापडलेले पाकीट साईभक्तास केले परत कर्मचारी श्रीमती गर्जे यांचा प्रमाणिकपणा अयुब पठाण/ शिर्डी (संपादक : हेमकांत गायकवाड) श्री साईबाबा संस्थ...
सापडलेले पाकीट साईभक्तास केले परत
कर्मचारी श्रीमती गर्जे यांचा प्रमाणिकपणा
अयुब पठाण/ शिर्डी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी मंदिराच्या गेट क्र. २-अ जवळ,संरक्षण विभागाच्या कंत्राटी महिला कर्मचारी श्रीमती उज्ज्वला गर्जे यांना एक पाकीट सापडले. पाकिटात ₹ 11000/- रोख रक्कम तसेच ‘हेमा डायकेम प्रा. लि., वापी (गुजरात)’ असा शिक्का असलेले ओळखपत्र होते. ओळखपत्रावर श्री.नीरज दुबे यांचे नाव होते.
श्रीमती गर्जे यांनी पाकीट तात्काळ संरक्षण कार्यालयात जमा केले. ओळखपत्रावरील माहितीच्या आधारे गुगलवरून संबंधित कंपनीचा संपर्क क्रमांक शोधून संपर्क केला व त्यांच्याकडून श्री. नीरज दुबे यांचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्यांच्याशी संपर्क साधला व पाकीट सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर श्री. नीरज दुबे हे कार्यालयात आले. त्यांना त्यांचे पाकीट व रोख रक्कम परत केली.
यावेळी दुबे यांनी, “मी बसने निघालो होतो. माझे पैसे परत मिळतील अशी पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र श्री साईबाबाजींच्या कृपेने आणि श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचारी यांच्या प्रामाणिकपणामुळे माझे पैसे मला परत मिळाले,” असे सांगून संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments