adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची मान उंचावली भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे

  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची मान उंचावली   भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे मोताळा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) मोताळा :...

 नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची मान उंचावली 

 भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे





मोताळा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


मोताळा : देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मोताळा मंडळाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


 बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना विजयराज शिंदे म्हणाले की, मोदीजींनी देशासमोर ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हा विचार ठेवला आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची फळे पोहोचविणे, गरीब, शेतकरी, महिला, युवा तसेच वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणे, हा सेवाभाव आपल्या कार्याचा आधार असला पाहिजे.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक व्यासपीठावर आपली भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात नवी दिल्ली घोषणेवर सदस्य देशांची सहमती झाली. तसेच आफ्रिकन युनियनला G20 चे कायमस्वरूपी सदस्यत्व मिळाले. भारताने विकसनशील देशांच्या प्रश्नांना जागतिक व्यासपीठावर अधिक महत्त्व मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

अंतराळ क्षेत्रात चांद्रयान-3 चे यशस्वी चंद्रावर अवतरण ही भारताच्या वैज्ञानिक क्षमतेची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. डिजिटल क्षेत्रात UPI सारख्या तंत्रज्ञानामुळे भारताची डिजिटल क्षमता जगासमोर आली आहे. या सर्व बाबींकडे केवळ शासनाची कामगिरी म्हणून न पाहता, कोट्यवधी भारतीयांच्या सामूहिक सामर्थ्याचे प्रतीक म्हणून पाहिले पाहिजे. यामुळे आज भारताची मान जगाच्या व्यासपीठावर उंचावली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

मोदीजींच्या जन्मदिनानिमित्त प्रत्येक कार्यकर्त्याने सेवाभावाने समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. रक्तदान, आरोग्यसेवा, स्वच्छता, वृक्षारोपण, गरजूंची मदत तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सेवा कार्याला गती देण्याचे आवाहन करण्यात आले.

दि. 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत महिनाभर विविध सेवा उपक्रम राबविण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.


  या कार्यक्रमात मोताळा तालुक्यातील आदर्श अंगणवाडी सेविकांचा मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये वंदना ढकचवडे — अंगणवाडी सेविका, सारोळा मारुती, अरुणा माहुरे सहस्त्रमुडी तांडा,ज्येष्ठा अंगणवाडी सेविका प्रमोदिनी राऊत पुन्हई यांचा सत्कार करण्यात आला.


तसेच सेवा संकल्प अभियानाच्या अंतर्गत मोताळा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा तालुकाध्यक्ष सचिन शेळके यांनी केले.

 

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, मा. जिल्हा सरचिटणीस यशवंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे, मनोहर नारखेडे, ज्येष्ठ नेते तुळशीराम मापारी, बिहारी चोपडे, देविदास वानखेडे, नारायण हेलगे, हाजी भाई, गणेशभाई जवरे, मा. जि. प. सदस्य पुरुषोत्तम लखोटिया, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दत्ता पाटील, मोताळा शहराध्यक्ष चंद्रशेखर चोपडे, तालुका सरचिटणीस नारायण देशमुख, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अंजली पाटील, कुमुदिनीताई कोलते, बळीराम अंभोरे, तालुका उपाध्यक्ष सुनील भामद्रे,संजय वाघ, नाना राजगुरे, किशोरसिंह ठाकूर, दादाराव जुनारे, राजेंद्र धोरण, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रतिक इंगळे, पुरुषोत्तम दाते, पद्माकर सरोदे, गजानन पांडे, बळीराम सातपुते, जीवन मापारी सरपंच काबरखेड, गणेश बिचकुले, तुकाराम राठोड, गजानन आटोळे, अमोल परमार, विजय मानकर, संतोष वाढे, स्वप्निल खर्चे, निळकंठ बढे, दीपक मिरगे, दिलीप येरावळ, श्रीकृष्ण सुरळकर, कैलास पाटील, अक्षय पैसोळे, अजयसिंग राजपूत, विनोद वानखेडे, बाळूभाऊ मिरगे, रोहिदास राठोड, लखन सपकाळ, विठ्ठल भारसाकडे, सुधाकर मापारी, गोपाल गोड यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा हीच साधना, जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून महिनाभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला

No comments