अंतुर्लीत छत्रपती शिवाजी नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाची नियोजन बैठक संपन्न प्रतिनिधी किरण धायले (संपादक : हेमकांत गायकवाड) दि. 27/9/2026...
अंतुर्लीत छत्रपती शिवाजी नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाची नियोजन बैठक संपन्न
प्रतिनिधी किरण धायले
(संपादक : हेमकांत गायकवाड)
दि. 27/9/2026 रोजी जय शिवाजी दुर्गा मंडळ, शिवाजीनगर अंतुर्ली ता. मुक्ताईनगर यांच्या वतीने आगामी नवरात्री उत्सवाच्या नियोजनासाठी विशेष बैठक चे आयोजन करण्यात आले. बैठक मंडळाचे अध्यक्ष नत्थू दुटटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
मागील ४० वर्षांची भक्तीची परंपरा दुर्गा मातेच्या आशीर्वादाने अविरत चालू आहे.
गेल्या ४० वर्षांपासून जय शिवाजी दुर्गा मंडळाच्या वतीने आई जगदंबेची स्थापना भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात करण्यात येत आहे. ही परंपरा यंदाही अधिक उत्साहाने आणि भव्य स्वरूपात पुढे नेण्यासाठी बैठकीमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये आई जगदंबेचे भव्य आगमन आकर्षक व नाविन्यपूर्ण देखावे,तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम,नवरात्रीतील धार्मिक व सामाजिक उपक्रम,भव्य विसर्जन सोहळा
याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या सूचना व नियोजन मांडले.
भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेची ४० वर्षांची परंपरा जपत यंदाचा नवरात्री उत्सव अधिक भव्य, सुंदर आणि भक्तिमय करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या बैठकीस उपस्थित अध्यक्ष नत्थू दुटटे, नरेंद्र दुटटे, विलास काळे, बाळू दाणी सर, बंडू वंजारी, सुरेश पालवे, केशव महाजन, डॉ. रमेश कोळी, विलास दुटटे, कैलास बारी, गणेश पंडित दाणी, गणेश मधुकर दाणी, दिलीप दाणी, अनिल रघुनाथ महाजन, विजय दाणी, नितीन बोरसे, दिनेश महाजन, राजू बारी, भैय्या दाणी, दीपक पालवे, महेंद्र सुरळकर, अमोल पाटील, जयेश दाणी, प्रशांत ठोंबरे, पंकज पिंगळे, समाधान महाजन, शालिक महाजन, सुधाकर राठोड, संजय महाजन, अमोल पळसकर, पंकज दाणी, तन्मय दाणी, सौरभ सोनार, गणेश गोविंदा दाणी, तुषार महाजन, सुमित पालवे, मेघराज दाणी, तुषार सोनवणे, पंकज बारी, चेतन पालवे, निलेश दाणी, रुपेश दाणी, मयूर बारी, गोपाळ दुटटे, वैभव पालवे, प्रतीक तराळ, तुषार दुटटे, कुणाल वाघ, चेतन बेलदार, समर्थ धायले तसेच समस्त जय शिवाजी दुर्गा मंडळ पदाधिकारी व शिवाजीनगर ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments