adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वडोदे व सम्राट बुद्ध विहार फैजपूर येथे वर्षावास प्रवचन मालिका उत्साहात संपन्न

वडोदे व सम्राट बुद्ध विहार फैजपूर येथे वर्षावास प्रवचन मालिका उत्साहात संपन्न इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड) फैजपूर येथे दिन...

वडोदे व सम्राट बुद्ध विहार फैजपूर येथे वर्षावास प्रवचन मालिका उत्साहात संपन्न




इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


फैजपूर येथे दिनांक २८/९/२०२६ रविवार रोजीभारतीय बौद्ध महासभेतर्फे वडोदे व सम्राट बुद्ध विहार फैजपूर येथे आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास प्रवचन मालिकेला सुरुवात झालेली आहे.विहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन होत असते. बुद्ध धम्म संघ, प्रज्ञा, शिल, करुणा तसेच त्रिपिटक, भारताचे संविधानया विषयांवर केंद्रीय शिक्षक बी. डी. महाले, माया ताई सुरेश तायडे, धम्मसेवक विष्णू मेश्राम हे उपासक उपासिकांना मार्गदर्शन करीत असतात.उपासक उपासिका मोठ्या उत्साहाने विहारात धम्म श्रवण करण्यासाठी येत असतात.वडोदे बुद्ध विहार व फैजपूर सम्राट बुद्ध विहार येथे एक आनंदमय वातावरण निर्माण झालेले आहे उपासकांमध्ये मैत्री भावना दानभावना एकोपा निर्माण झालेला आहे या वर्षावास प्रवचन मालिकेसाठी जिल्हा संघटक -वसुंधरा ताई मेढे,रेखाताई शैलेंद्र मेढे,रूपाली धनराज मेढे,निर्मला अवसरमल,कोकिळाबाई गोकुळ मेढे इंगळे ताई, ज्योती महाले,इंगळे ताई ,लताबाई मेढे, समता सैनिक दल प्रमुख बबन तायडे,निळकंठ भालेराव,देविदास साळुंखे, पप्पू मेढे आणि चंद्रमणी मेढे यांचे सहकार्य लाभले.

No comments