जे.ई. स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन मुक्ताईनगर प्रतिनिधी सतिश गायकवाड (संपादक : हेमकांत गायकवाड) गणेशोत्सवानिमित...
जे.ई. स्कूलमध्ये गणेशोत्सवानिमित्त चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतिश गायकवाड
(संपादक : हेमकांत गायकवाड)
गणेशोत्सवानिमित्त जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आकर्षक चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन आ. एकनाथराव खडसे (विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
यावेळी प्रा.सुनिल नेवे,संस्थाचालक महेश पाटील विद्यालयाचे प्राचार्य व्ही.एम. चौधरी, उपप्राचार्या व्ही.के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही.डी. बऱ्हाटे, के.आर. कवळे, एस.एम. वाढे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी श्रीगणेशाच्या विविध रूपांवर आधारित आकर्षक चित्रे, रंगकाम व विविध कलाकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याने प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरली ती कलाशिक्षिका ए.डी. भोळे यांनी साकारलेली श्रीगणेशाची आकर्षक रांगोळी. आ. एकनाथराव खडसे यांनी रांगोळीचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या श्रीगणेशाच्या विविध रूपांतील चित्रांचे व रंगकामाचेही विशेष कौतुक केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीबद्दल आ. खडसे यांनी विद्यालयाचे अभिनंदन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळून त्यांच्या कलागुणांचा विकास होतो, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आयोजन कलाशिक्षक ए.डी. भोळे, एम.आर. सुरवाडे व एच.बी. बाऊस्कर यांनी केले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


No comments