भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी राहुल गोपाल महाजन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक : हेमकांत गायकवाड) भारतीय जनता पार्टी जळगाव जि...
भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी राहुल गोपाल महाजन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा (पूर्व) किसान मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील रहिवासी राहुल गोपाल महाजन यांची निवड करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण शशिकांत चौधरी यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या निवडीमुळे मोठा वाघोदा बुद्रुक सह रावेर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यांच्यावर विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या अडीअडचणी विविध प्रकारच्या समस्या व प्रश्न मांडण्यासाठी तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्याला बळकटी देण्यासाठी राहुल महाजन यांच्यावर जिल्हा पातळीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवरील त्यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
राहुल महाजन यांच्या भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार नंदकिशोर महाजन आमदार अमोल जावळे भाजपा जळगांव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर सुरेश धनके आदिसह पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते मोठा वाघोदा वासियांतर्फे राहुल महाजन यांना शुभेच्छा व अभिनंदन केले जात आहे

No comments