adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लासूर येथे बाजार चौक व्यावसायिक गणेश मित्र मंडळातर्फे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन

लासूर येथे बाजार चौक व्यावसायिक गणेश मित्र मंडळातर्फे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन सदरचे शिबीरासाठी येथिल बाजार चौक व्यावसायिक गणेश मंडळाने सह...

लासूर येथे बाजार चौक व्यावसायिक गणेश मित्र मंडळातर्फे रक्त तपासणी शिबिराचे आयोजन




सदरचे शिबीरासाठी येथिल बाजार चौक व्यावसायिक गणेश मंडळाने सहकार्य केले सुरवातीला मंडळातर्फे मंडळाचे पदाधिकारी यांच्यावतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला यावेळी कैलास बाविस्कर, वासुदेव महाजन,विजय कोळी, विक्रम महाजन ह‌.भ‌.प‌.बापू‌ महाराज चौधरी, दिलीप पालीवाल, गणेश जैस्वाल , विरेंद्र जैन,जुगल गुरव यांच्या सह मंडळाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

लासूर प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


लासूर : येथील बाजार चौक व्यावसायिक गणेश मित्र मंडळाच्या वतीने रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने या उपक्रमाचे आयोजन केले असून, सदर शिबिरास ग्रामस्थांच्या मोठा प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात नागरिकांची विविध प्रकारची प्राथमिक रक्त तपासणी करण्यात आली, लासूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रियंका तांबे,आरोग्य सेविका अलकरी,आरोग्य सेवक घनश्याम पाटील,आरोग्य सेविका संगीता भादले,गट प्रवर्तक सरला माळी यांसह सर्व आशा सेविकांचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, रक्तातील साखर यासह आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आल्या.

ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्यविषयक तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच विविध आजारांचे प्राथमिक स्तरावर निदान व्हावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता. मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

No comments