adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रत्नापिंपरी येथे आदिवासी भिल्ल समाजासाठी विशेष रेशन कार्ड शिबिर घेण्याची मागणी तहसीलदारांकडे एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण पारधी यांचे निवेदन

रत्नापिंपरी येथे आदिवासी भिल्ल समाजासाठी विशेष रेशन कार्ड शिबिर घेण्याची मागणी तहसीलदारांकडे एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ...

रत्नापिंपरी येथे आदिवासी भिल्ल समाजासाठी विशेष रेशन कार्ड शिबिर घेण्याची मागणी

तहसीलदारांकडे एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण पारधी यांचे निवेदन





 पारोळा प्रतिनिधी 

 (संपादक हेमकांत गायकवाड)


पारोळा : रत्नापिंपरी, ता. पारोळा, जि. जळगाव येथील आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांच्या रेशन कार्डसंदर्भातील प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी गावात विशेष रेशन कार्ड शिबिर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रविण मिंढाराम पारधी यांनी तहसीलदार, पारोळा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, रत्नापिंपरी येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या वस्तीमध्ये अनेक नागरिकांचे रेशन कार्ड काढणे, नवीन रेशन कार्ड तयार करणे, नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, दुरुस्ती करणे तसेच रेशन कार्डशी संबंधित इतर कामे प्रलंबित आहेत. या कामांसाठी नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक तसेच वेळेच्या दृष्टीने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विशेषतः गावातील अनेक नागरिकांना तहसील कार्यालयात वारंवार ये-जा करणे आर्थिकदृष्ट्या व वेळेच्या दृष्टीने अडचणीचे ठरत असल्याने, नागरिकांच्या सोयीसाठी रत्नापिंपरी गावातच विशेष रेशन कार्ड शिबिर आयोजित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या शिबिरामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांची रेशन कार्डसंदर्भातील सर्व कामे जागेवरच स्वीकारून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनाची तहसील प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रत्नापिंपरी येथे विशेष शिबिर आयोजित प्रविण पारधी जळगाव जिल्हाध्यक्ष, एकलव्य भिल्ल समाज संघटना करावे आणि आदिवासी भिल्ल समाजातील नागरिकांना रेशन कार्डसंदर्भातील आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.

No comments