मैदानावर जिद्द,धावण्यात वेग; आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरावर निवड चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) आदिवासी विकास विभागाच...
मैदानावर जिद्द,धावण्यात वेग; आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरावर निवड
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
आदिवासी विकास विभागाच्या वतीने तसेच प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाने दिनांक २० रोजी आयोजित करण्यात आलेल्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांना चोपडा महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरुवात करण्यात आली.शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळेतील एकूण ४४२ विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला.
क्रीडा स्पर्धेची शपथ घेत
वैयक्तिक धावण्याच्या विविध क्रीडा प्रकारात आदिवासी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या जिद्दीचे,वेगाचे आणि उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे दर्शन घडविले.कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्रजी मुसळे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक,शिक्षिका,समन्वयक यावेळी उपस्थित होते.
धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.विजयासाठी विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने धाव घेत उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी निवड करण्यात आली.
स्पर्धेदरम्यान मैदानाच्या दुतर्फा उपस्थित विद्यार्थी,शिक्षक व क्रीडाप्रेमींनी टाळ्यांचा कडकडाट करत खेळाडूंचा उत्साह वाढविला. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळत असून,या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत आहे.
“जिद्द, मेहनत आणि वेगाच्या जोरावर आदिवासी विद्यार्थ्यांनी मैदान गाजविले अशी भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.सूत्रसंचालन प्रमोद भालेराव यांनी केले.

No comments