adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सार्वजनिक विद्यालय अडावद येथे माता पालक शैक्षणिक मेळावा संपन्न

सार्वजनिक विद्यालय अडावद येथे माता पालक शैक्षणिक मेळावा संपन्न  अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात माता पालक मेळाव्यात मार्गदर्शन करत...

सार्वजनिक विद्यालय अडावद येथे माता पालक शैक्षणिक मेळावा संपन्न 



अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात माता पालक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक अशोक कदम एम जी पाटील सुनिल महाजन व पालक व मान्यवर 

अडावद प्रतिनिधी : रविंद्र कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


अडावद ता चोपड़ा येथील सार्वजनिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये माता पालक शैक्षणिक मेळावा हा उपक्रम महाराष्ट्र शासनाने व्यापक सामाजिक चळवळीचे रूपात आयोजित करण्याचे ठरविले आहे, या अनुषंगाने आज दिनांक ७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक विद्यालयात माता पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक माता-पितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक कदम पर्यवेक्षक एम जी पाटील उपशिक्षिका शुभांगी देशमुख यांनी पालकांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालक सुनील महाजन हे होते.विद्यालयाच्या उपशिक्षिका नलिनी पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांचे बाल अवस्थेतील मानसिकता, मोबाईल मुळे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम यावर पालकांशी चर्चा केली तर मुख्याध्यापक श्री कदम यांनी माता पालकांशी थेट संवाद साधत पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण व्हावी, आई वडिलांची भूमिका, तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, सूप्त गुणांना वाव, गुणवत्ता वाढ, त्यांची शाळेची उपस्थिती कमी ठेवणे, आजची कौटुंबिक व्यवस्था या महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती दिली. पालकांनी देखील मनातील विचार मांडत शिक्षकांशी संवाद साधला.शेवटी पालक सुनील महाजन यांनी अध्यक्षीय भाषण दिले, आयोजित उपक्रमाबद्दल सर्व पालकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन पाटील यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले. 


फोटो कॅप्शन अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात माता पालक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक अशोक कदम एम जी पाटील सुनिल महाजन व पालक व मान्यवर उपस्थित

No comments