adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोळी महादेव जमातीच्या जात प्रमाणपत्र प्रस्तावांना नकार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी

कोळी महादेव जमातीच्या जात प्रमाणपत्र प्रस्तावांना नकार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी बुलढाणा प्रतिनिधी : अमोल बावस्कर  (संपा...

कोळी महादेव जमातीच्या जात प्रमाणपत्र प्रस्तावांना नकार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी




बुलढाणा प्रतिनिधी : अमोल बावस्कर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


बुलढाणा तालुक्यातील सेतू केंद्रांमार्फत कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या बांधवांचे जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारीवरून कोळी महादेव समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना स्मरणपत्र देण्यात आले आहे.कोळी महादेव समाजाच्या वतीने गणेश पांडुरंग इंगळे यांनी दिलेल्या स्मरणपत्रात नमूद केले आहे की, दि. 27/07/2026 रोजी याच विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले होते. सदर निवेदनामध्ये बुलढाणा तालुक्यातील विविध महा-ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) चालकांकडून कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या बांधवांचे जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याची माहिती देण्यात आली होती.

तसेच सेतू केंद्र चालकांकडून नागरिक व विद्यार्थ्यांना होत असलेल्या अडचणींची गंभीर दखल घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, निवेदन देऊनही अद्याप अपेक्षित कार्यवाही झाल्याचे निदर्शनास आले नसल्याने पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले आहे.स्मरणपत्राद्वारे बुलढाणा तालुक्यातील सर्व सेतू केंद्र चालकांना कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या बांधवांचे जात प्रमाणपत्राचे प्रस्ताव स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.कायदेशीर प्रस्ताव स्वीकारण्यास नकार देणाऱ्या अथवा नागरिकांची अडवणूक करणाऱ्या संबंधित सेतू केंद्र चालकांवर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे कोळी महादेव अनुसूचित जमातीच्या बांधवांसह विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने, दि. 27/07/2026 रोजी दिलेल्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रकरणात योग्य ती कार्यवाही करावी व सेतू केंद्र चालकांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.गणेश पांडुरंग इंगळे यांनी कोळी महादेव समाज बांधवांच्या वतीने हे स्मरणपत्र जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना सादर केले आहे.

No comments